Lokmat Sakhi >Food > फक्त १० मिनिटांत सकाळच्या नाश्त्याला बनवा गरमागरम, क्रिस्पी ब्रेड पकोडा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

फक्त १० मिनिटांत सकाळच्या नाश्त्याला बनवा गरमागरम, क्रिस्पी ब्रेड पकोडा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

Bread Pakoda Recipe :आठवड्यातून एकदातरी तुम्ही ब्रेड पकोडा नक्की ट्राय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 07:53 PM2021-12-13T19:53:45+5:302021-12-13T20:04:58+5:30

Bread Pakoda Recipe :आठवड्यातून एकदातरी तुम्ही ब्रेड पकोडा नक्की ट्राय करू शकता.

Bread Pakoda Recipe : How to make Bread Pakoda Evening snacks aloo stuffed bread pakoda | फक्त १० मिनिटांत सकाळच्या नाश्त्याला बनवा गरमागरम, क्रिस्पी ब्रेड पकोडा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

फक्त १० मिनिटांत सकाळच्या नाश्त्याला बनवा गरमागरम, क्रिस्पी ब्रेड पकोडा; ही घ्या सोपी, चविष्ट रेसेपी

सकाळच्या नाश्त्याला रोज रोज काय नवीन बनवायचं असा प्रश्न प्रत्येक घरातील बायकांना पडतो. पोहे, उपमा, चहा चपाती तेच तेच खाऊन कंटाळा आलेला  असतो. आठवड्यातून एकदातरी तुम्ही ब्रेड पकोडा नक्की ट्राय करू शकता. अनेकांना सॅण्डविच किंवा चहासोबत ब्रेड खायला खूप आवडतो.  ब्रेड पकोडे बनवण्यसाठी तुम्हाला जास्तीत जास्त  अर्धा तास लागेल. सकाळच्यावेळी कितीही घाई असेल तरीही नाश्त्याला या पदार्थाचा आनंद घेऊ शकता. (How to make Bread Pakoda)  ब्रेड पकोडा ही एक स्वादिष्ट भारतीय तळलेली पाककृती आहे. या रेसिपीला ब्रेड भज्जी असेही म्हणतात. ब्रेड पकोडा तुम्ही आवडीनुसार डीप फ्राय किंवा शेलो फ्राय करू शकता. 

(Image Credit- dinedelicious.in)

साहित्य

८ ते ९  ब्रेड स्लाईस, ३ ते ४ बटाट्याची पिवळी भाजी, १ कप बेसन, २ चमचे तांदळाचं पीठ, १ कप पाणी, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून जिरे, चिमुटभर खायचा सोडा, चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल.

कृती

१) सगळ्यात आधी बटाटे शिजवून कांदा, जीरं, मोहरी आणि हळद घालून भाजी बनवून घ्या.   शक्यतो ही भाजी जरा तिखट असेल असं पाहा. 

२) एका वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र करा. पाणी घालून पीठ तयार करून घ्या. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घाला.

३) मग ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या. एक एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा.  सुरीने ब्रेडचे २ भाग करावेत. 

४)  पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे. 

५) तळण्यासाठी तेल गरम करा. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे पिठात घोळवून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत गरमा गरम पकोडे, हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉस, चटणीसोबत इन्जॉय करू शकता. 

1) 

2) 

3) 

Web Title: Bread Pakoda Recipe : How to make Bread Pakoda Evening snacks aloo stuffed bread pakoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.