सकाळच्या नाश्त्याला किंवा (Breakfast) मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काही उत्तम पर्याय म्हणून तुम्ही ब्रेड, पोहे अशा पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Bread Poha Rings) यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही फक्त पोहे आणि रवा लागेल. स्वंयपाकघरात हे दोन्ही पदार्थ सहज मिळतील. ५ ते १० मिनिटांत चवदार चविष्ट नाश्ता बनून तयार होईल. ब्रेड आणि पोह्यांचा नाश्ता बनवण्यासाठी सोप्या स्टेप्स पाहा. (How to Make Bread Poha Ring)
ब्रेड-पोहा रिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१) ब्रेड स्लाईस- ४ ते ५
२) भिजवलेले पोहे- अर्धी ते एक वाटी
३) बारीक रवा- अर्धी वाटी
४) पाणी- अर्धा कप
दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात
५) कोथिंबीर- अर्धा कप
६) कढीपत्ता - ७ ते ८
७) बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- २ ते ३
८) हिंग- २ टिस्पून
९) मीठ- चवीनुसार
ब्रेड पोहा रिंग बनवण्याची कृती (How to Make Easy Breakfast)
१) सगळ्यात आधी ब्रेडचे ३ ते ४ स्लाईड मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्या. त्यात हलके भिजवलेले पोहे घाला, वाटीभर रवा घाला आणि पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
केस फार पातळ झालेत? तुळशीच्या पानांचा १ जादूई उपाय, कंटाळा येईल इतके दाट-लांब होतील केस
२) तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात चिरलेली कोथिंबीर घाला, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, चिमुटभर हिंग आणि चमचाभर मीठ घाला.
पोट सुटलंय, मांड्यांचा शेप बिघडला? १० दिवस सकाळी हे पाणी प्या, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
३) हाताला तेल लावून त्यावर हे मिश्रण ठेवून वड्याप्रमाणे आकार द्या आणि वडे खमंग, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहे खमंग ब्रेड पोहा रिंगचा नाश्ता. सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता.