नाश्ता (Breakfast) म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर आधी उपमा, शिरा किंवा पोहे येतात (Upma Recipe). तर काही जण नाश्त्याला पोळी भाजीही खातात. महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये हे पदार्थ फेमस आहेत (Cooking Tips). तर काही जण नाश्त्याला साऊथ इंडिअन पदार्थही खातात. दाक्षिणात्य पदार्थ चवीला भन्नाट आणि पौष्टीक असतात.
नाश्त्याला तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, आपण रात्री उरलेल्या पदार्थाला फोडणी देऊन खातो. उदाहरणार्थ फोडणीची पोळी अथवा फोडणीचा भात. फोडणी घालताच त्या पदार्थाची चव वाढते. बऱ्याचदा आपल्या घरात ब्रेडही शिल्लक राहतो. उरलेला ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कडकही होतो. उरलेला कडक ब्रेड फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा चमचमीत उपमाही करू शकता. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही. अगदी कमी साहित्यात हा पदार्थ तयार होईल. अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिलाही हा पदार्थ प्रचंड आवडतो(Bread upma recipe, how to make bread upma).
उरलेल्या ब्रेडचा चमचमीत उपमा करण्यासाठी लागणारं साहित्य
ब्रेड
मोहरी
जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा..
जिरं
कांदा
हळद
हिरवी मिरची
कडीपत्ता
कृती
सर्वात आधी ब्रेडचे लहान तुकडे करा. आपण कोणताही ब्रेड घेऊ शकता. ब्रेडचे तुकडे केल्यानंतर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात छोटा चमचा मोहरी, जिरं, एक बारीक चिरलेला कांदा, चिमुटभर हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून भाजून घ्या.
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
साहित्य भाजून घेतल्यानंतर त्यात ब्रेडचे तुकडे घालून भाजून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार मसाले घाला. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे चमचमीत ब्रेडचा उपमा खाण्यासाठी रेडी.