Lokmat Sakhi >Food > पावसाळी हवेत भूक मंदावली? नाश्त्याला करा पचायला हलके ३ पदार्थ, चवीला मस्त-पोटालाही आराम

पावसाळी हवेत भूक मंदावली? नाश्त्याला करा पचायला हलके ३ पदार्थ, चवीला मस्त-पोटालाही आराम

Breakfast Recipe Easy to Digest options for rainy season : हवाबदल होताना पचेल असा हलका आहार घेतलेला केव्हाही चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 03:42 PM2022-08-02T15:42:57+5:302022-08-02T15:45:31+5:30

Breakfast Recipe Easy to Digest options for rainy season : हवाबदल होताना पचेल असा हलका आहार घेतलेला केव्हाही चांगला

Breakfast Recipe Easy to Digest options for rainy season : Hunger slow down in the rainy weather? Have 3 easy-to-digest foods for breakfast, great taste and comfort for the stomach | पावसाळी हवेत भूक मंदावली? नाश्त्याला करा पचायला हलके ३ पदार्थ, चवीला मस्त-पोटालाही आराम

पावसाळी हवेत भूक मंदावली? नाश्त्याला करा पचायला हलके ३ पदार्थ, चवीला मस्त-पोटालाही आराम

Highlightsपण नियमित भाकरी खातोच असे नाही. अशावेळी ज्वारीच्या पीठाचा उपमा आपण ब्रेकफास्टला किंवा रात्रीच्या जेवणासाठीही करु शकतो प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने मूग आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

रोज ब्रेकफास्टला काय करायचं असा प्रश्न प्रत्येकीला पडतो. सतत पोहे, उपीट आणि साबुदाण्याची खिचडी करुन आणि खाऊनही आपल्याला कंटाळा येतो. विशेष म्हणजे या पदार्थांतून शरीराला विशेष पोषण मिळतेच असे नाही. विशेष म्हणजे पावसाळी हवेत पचनशक्ती क्षीण होत असल्याने भूक मंदावते. अशावेळी पोटाला सहज पचतील असे पदार्थ आहारात असायला हवेत असे आहारतज्ज्ञ सांगत असतात. याच कारणामुळे या काळात पर्युषण, श्रावणातील एक वेळचे उपवार, रमजान असे केले जाते. ब्रेकफास्ट हा आपल्या दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. हा आहार पोटभर आणि चांगला असेल तर आपला दिवस चांगला जायला मदत होते. पाहूयात पावसाळी हवेत पोटाला सहज पचतील असे काही सोपे पदार्थ (Breakfast Recipe Easy to Digest options for rainy season)...

(Image : Google)
(Image : Google)

१. तांदळाची खीर

तांदूळ तूपावर चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करायचे. कढईत थोडं तूप घालून त्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालून ते शिजायला ठेवायचे. उकळी आली की त्यामध्ये सायीसकट दूध, सुकामेव्याचे काप, साखर आणि वेलची पूड घालायची. या खीरीमध्ये आपण शिजताना जितकं दूध घालतो तितकं ते आटत जातं. त्यामुळे खीर वाटीत घेतली की त्यात आपल्याला हवं तितकं दूध घ्यावं आणि गरमागरम खीर खावी. यामध्ये तुम्ही आवडीनुसार केशर, खसखस असे काहीही घालू शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

२. मूगाचे डोसे

यासाठी हिरव्या सालीचे मूग किंवा मूगाची डाळ असे काहीही चालू शकते. रात्रभर यातील घरात जे उपलब्ध आहे ते भिजत घालावे. सकाळी उठल्यावर त्यामध्ये लसूण, मीरची, जीरं, मीठ घालून मिक्सरवर वाटून घ्यावे. १० मिनीटांनी तव्यावर तेल लावून डोसे घालावेत. दही, सॉस, चटणी, लोणचं अशा कशासोबतही हे डोसे अतिशय चविष्ट लागतात. मूड पचायला हलके असतात त्यामुळे पचनशक्ती मंद असताना पावसाळ्याच्या दिवसांत हे डोसे ब्रेकफास्टसाठी उत्तम उपाय आहेत. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने मूग आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. ज्वारीचा उपमा 

आपल्याला रव्याचा, दलियाचा उपमा माहित असतो. पण ज्वारीच्या पिठाचा उपमा आपण क्वचितच केला असेल. ज्वारीचे पीठ पचायला हलके असल्याने या वातावरणात ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा असे आपल्याला सांगितले जाते. पण आपण नियमित भाकरी खातोच असे नाही. अशावेळी ज्वारीच्या पीठाचा उपमा आपण ब्रेकफास्टला किंवा रात्रीच्या जेवणासाठीही करु शकतो. हे पीठ कढईत चांगले परतून घ्यायचे. नंतर ते एका ताटात काढून कढईमध्ये आपण नेहमी करतो तशी फोडणी करायची. यामध्ये कडीपत्ता, दाणे, कांदा घालायचा. त्यावर पीठ घालून अंदाजे पाणी घालायचे. पीठ फार गच्च किंवा चिकट होईल इतके जास्त पाणी घालायचे नाही. तसेच कच्चे राहील इतके कमीही घालायचे नाही. अंदाज घेत पाणी घातले तर पीठ चांगले शिजते आणि हा उपमा एकजीव होतो. झाकण ठेवून चांगली वाफ आल्यावर त्यावर लिंबू, कोथिंबीर घालायचे.  

Web Title: Breakfast Recipe Easy to Digest options for rainy season : Hunger slow down in the rainy weather? Have 3 easy-to-digest foods for breakfast, great taste and comfort for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.