Join us  

आहारात तूप हवंच पण कोणतं तूप चांगलं? गायीचं की म्हशीचं? तब्येतीसाठी नेमकं काय निवडायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2023 7:05 PM

Buffalo Ghee Vs Cow Ghee, Which Is Better ? : तूप कोणतं चांगलं याविषयी कायमच वाद-प्रतिवाद होतात, मात्र आपल्यासाठी योग्य काय हे कसं ठरवायचं?

प्रत्येक भारतीय घरात तुपाचा वापर रोजच्या जेवणात कमी अधिक प्रमाणांत केला जातोच. वरण भात, पुरणपोळी, मोदक, खिचडी या पदार्थांची तूपाशिवाय आपण अजिबातच कल्पना करू शकत नाही. तूप म्हणजे भारतीयांच्या आहारातील महत्त्वाचा भागच आहे. घरी आपण गाय किंवा म्हशीचे दूध तापवून लोणी कढवून त्याचे तूप तयार करतो. तुपामुळे शरीरात ताकद राहते व आवश्यक पोषक तत्वेही मिळतात, त्यामुळे घरातील मोठी माणसे तूप खाण्याचा सल्ला देतात. भेसळयुक्त तूप खाणे तब्येतीसाठी हानीकारक ठरत यामुळे आपण बऱ्याचदा घरीच गायीचे व म्हशीचे दूध वापरून तूप तयार करतो. जाडी वाढेल, वजन वाढेल या भीतीने आपल्यापैकी काही लोक तूप खात नाहीत. तसेच तूप खायचे झाल्यास, कोणते तूप खावे? नेमके गायीच्या की म्हशीच्या दुधापासून तयार केलेले तूप खावे?

केंद्र सरकारच्या इ. एस. आय. सी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. रितू पुरी यांच्या मते, खरतर या दोन्ही प्रकारच्या तुपांपैकी कोणत्याही एका प्रकारचे तूप खाणे योग्य किंवा सर्वश्रेष्ठ आहे, असे ठोसपणे म्हणता येणार नाही. तरीपण, म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपापेक्षा गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप खाणे शरीरासाठी योग्य आहे. गायीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे सेवन सर्व वयोगटातील व्यक्ती करु शकतात. विशेषतः लहान मुलांनी गायीच्या दुधापासून तयार केलेलच तूप खाणं योग्य आहे. या तुपाचे सेवन केल्याने पचनसंस्था व प्रतिकार शक्तीत सुधारणा होण्यास मदत होते. गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप खाल्ल्यास, हाडांना बळकटी तसेच हृदयाचे व डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते(Buffalo Ghee Vs Cow Ghee, Which Is Better ?).

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तूप उपयुक्त... जर आपण वाढते वजन नियंत्रणात करण्याच्या प्रयत्नांत असाल तर अशावेळी, गायीच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाचे सेवन करणे लाभदायक ठरेल. गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप वजन घटविण्यासाठी फारच फायदेशीर ठरत. हे तूप खाल्ल्याने आपल्या शरीरातील नको असलेले फॅट्स शरीरातून बाहेर काढून टाकण्यास मदत करते. म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं तूप वजन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत. म्हशीच्या दुधामध्ये असणारे अतिरिक्त फॅट्स आणि कॅलरीज आपले वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे सेवन करताना, ते योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे. हे तूप गरजेपेक्षा अधिक जास्त प्रमाणांत खाल्ल्यास शरीरास अपायकारक ठरु शकत. जे लोक शारीरिकदृष्ट्या अधिक अ‍ॅक्टिव्ह किंवा दैनंदिन जीवनांत खूप कष्टाचे काम करतात अशा लोकांसाठी म्हशीच्या दुधापासून तयार केलेले तूप खाणे योग्य मानले जाते. 

कोणते तूप पचनासाठी चांगले आहे... 

गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप पचनासाठी हलके असते. आपल्या पोटाचे स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप खाणे योग्य आहे. गायीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपात फॅट्सचे प्रमाण कमी असते. या तुपात सॉल्युबल अ‍ॅसिड असल्यामुळे ते लवकर पचते. घरातील वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांनी गायीच्या दुधापासून तयार केलेलं तूप खाणे योग्य असते.

टॅग्स :अन्नआरोग्य