Lokmat Sakhi >Food > खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes खास प्रसंगी, कमी साहित्यात झटपट मऊसुत करा आंब्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 05:31 PM2023-06-01T17:31:37+5:302023-06-01T17:34:20+5:30

Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes खास प्रसंगी, कमी साहित्यात झटपट मऊसुत करा आंब्याचा शिरा, तोंडात टाकताच विरघळेल

Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes | खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

शिरा कोणाला आवडत नाही. शिरा खाण्याचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. पण अनेकदा त्याच - त्याच पद्धतीचा शिरा खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी त्या-त्या मोसमात मिळणारी फळं टाकून शिरा करून पाहा. सध्या आंब्याचा सिझन सुरु आहे. आपण आंब्याचा शिरा ही रेसिपी ट्राय करून पाहू शकता. आंब्याचे अनेक प्रकार केले जातात. आंबा म्हटलं फळांचा राजा. आंब्याचा शिरा हा पदार्थ पाहिल्यानंतर नक्कीच अनेकांच्या तोंडातून पाणी सुटेल. ही रेसिपी आपण खास वटपौर्णिमेनिमित्त करू शकता. चला तर मग या गोड पदार्थाची कृती पाहूयात(Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes).

आंब्याचा शिरा करण्यासाठी लागणारं साहित्य

२ चमचे तूप

काजू

बदाम

१/२ कप आंब्याचे तुकडे

१/४ कप आंब्याची प्युरी

कोबीचे कबाब!-खरं नाही वाटत ना, पण कोबीचे खमंग कुरकुरीत कबाब करायला सोपे आणि चविष्ट

1 कप गरम पाणी

1/4 कप साखर

वेलची पावडर

कृती

मध्यम आचेवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप घाला, तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा घालून भाजून घ्या. मध्यम आचेवर साधारण ७-८ मिनिटे रवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

रवा भाजताना सतत ढवळत राहा. जेव्हा रवा हलका सोनेरी रंगाचा होईल, तेव्हा एका प्लेटमध्ये काढून ठेवा. आता पुन्हा पॅनमध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यावर त्यात काजू आणि चिरलेले बदाम घालून भाजून घ्या. आपण त्यात इतर सुकामेवा देखील अॅड करू शकता.

सुका मेवा भाजून झाल्यानंतर, त्यात चिरलेला आंबा घालून ४ ते ५ मिनिटांसाठी भाजून घ्या. ५ मिनिटानंतर त्यात आंब्याची प्युरी घालून मिक्स करा. व काही वेळानंतर भाजलेला रवा घालून एकजीव करा. रवा आंब्याच्या प्युरीमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यात एक कप गरम पाणी घाला.

कैरीची आंबटगोड शेव कधी खाल्ली आहे? सिझन संपण्यापूर्वी करा कुरकुरीत ‘कैरी शेव!’

आता ५ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, व त्यात आवडीनुसार साखर, वेलची पावडर, घालून मिश्रण पुन्हा मिक्स करा, व त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेऊन वाफ द्या. गॅस बंद करा, अशा प्रकारे आंब्याचा शिरा खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Buttery Rich Mango Sheera For Dessert Within Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.