Lokmat Sakhi >Food > कोबीची भाजी न आवडणारेही मिटक्या मारुन खातील ‘कोबीचा चिला’, धिरड्याचाच चमचमीत प्रकार-पाहा रेसिपी...

कोबीची भाजी न आवडणारेही मिटक्या मारुन खातील ‘कोबीचा चिला’, धिरड्याचाच चमचमीत प्रकार-पाहा रेसिपी...

Cabbage cheela recipe quick instant breakfast recipe : How To Make Cabbage Cheela At Home : Cabbage cheela Easy, quick & super healthy recipe : Healthy Cabbage cheela Breakfast Recipe : कोबीची भाजी आवडत नसली तरी कोबीचे धिरडे मात्र चवीला उत्तम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 06:50 PM2024-10-14T18:50:22+5:302024-10-14T19:07:11+5:30

Cabbage cheela recipe quick instant breakfast recipe : How To Make Cabbage Cheela At Home : Cabbage cheela Easy, quick & super healthy recipe : Healthy Cabbage cheela Breakfast Recipe : कोबीची भाजी आवडत नसली तरी कोबीचे धिरडे मात्र चवीला उत्तम...

Cabbage cheela recipe quick instant breakfast recipe How To Make Cabbage Cheela At Home Cabbage cheela Easy, quick & super healthy recipe Healthy Cabbage cheela Breakfast Recipe | कोबीची भाजी न आवडणारेही मिटक्या मारुन खातील ‘कोबीचा चिला’, धिरड्याचाच चमचमीत प्रकार-पाहा रेसिपी...

कोबीची भाजी न आवडणारेही मिटक्या मारुन खातील ‘कोबीचा चिला’, धिरड्याचाच चमचमीत प्रकार-पाहा रेसिपी...

'कोबी' हा अनेकांच्या नावडत्या पदार्थांच्या लिस्टमधील सगळ्यात पहिला पदार्थ आहे. कोबी म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण नाकं मुरडतात. ताटात कोबीची भाजी पाहिली की जेवावेसे वाटत नाही असे अनेकजण असतात. आपल्या सगळ्यांच्याच घरात आठवड्यातून किमान एक वेळा तरी कोबीची भाजी हमखास केली जाते. अशावेळी घरातील सगळ्यांकडूनच कोबीची भाजी खाण्याला नकार दिला जातो. अशा परिस्थितीत, आपण कोबी वापरुन झटपट तयार होणारा चिला करु शकतो(Cabbage cheela recipe quick instant breakfast recipe).

कोबीची भाजी खाण्यासाठी नको म्हणणारे देखील कोबीचा हा चटपटीत चिला (How To Make Cabbage Cheela At Home) अगदी आवडीने ताव मारत खातील. सकाळच्या नाश्त्याला काय करावे असा एक कॉमन प्रश्न सगळ्याच गृहिणींना पडतो. अशावेळी आपण पटकन कोबी चिरुन उपलब्ध असणाऱ्या साहित्यात पटकन कोबीचे धिरडे (Cabbage cheela Easy, quick & super healthy recipe) तयार करु शकता. कोबीची भाजी खाल्ली जात नाही अशावेळी आपण हे कोबीचे चटपटीत धिरडे करून दिले तर ते लगेच फस्त होतात. शिवाय कोबीचे धिरडे तयार करण्याची रेसिपी देखील तितकीच सोपी आहे. सकाळच्या कामाच्या गडबडीत जर नाश्ता तयार करायला पुरेसा वेळ नसेल तर कोबीचे धिरडे हा इन्स्टंट ब्रेकफास्टचा बेस्ट ऑप्शन आहे. यामुळे कोबीच्या पौष्टिकतेसोबतच काहीतरी वेगळा नवीन पदार्थ खाण्याचा आनंद देखील मिळतो(Healthy Cabbage cheela Breakfast Recipe).   

साहित्य :- 

१. कोबी - १ कप (बारीक चिरलेला)
२. गाजर - १ कप (बारीक किसून घेतलेले)
३. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)
४. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
५. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)
६. बेसन - १ कप 
७. तांदुळाचे पीठ - १ कप 
८. मीठ - चवीनुसार 
९. हळद - १/२ टेबलस्पून 
१०. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून 
११. पाणी - गरजेनुसार 
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. तेल - गरजेनुसार

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...


कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कोबी, कांदा, बारीक किसलेले गाजर, हिरव्या मिरच्या, बारीक किसून घेतलेलं आलं, बेसन, तांदुळाचे पीठ असे सगळे जिन्नस घ्यावेत. 
२. आता यात चवीनुसार मीठ, हळद, लाल मिरची पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळे पदार्थ चमच्याच्या मदतीने व्यवस्थित हलवून घ्यावे. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून कणकेप्रमाणे पीठ मळून घ्यावे. 

फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

३. गॅसच्या मंद आचेवर पॅन ठेवून तो व्यवस्थित गरम होऊ द्यावा. आता पॅन गरम झाल्यावर त्यावर चमचाभर तेल सोडून या पिठाचा गोळा ठेवून थालीपीठाप्रमाणे हलकेच हाताने दाब देत चिला थापून घ्यावा. 
४. आता पॅनमध्ये चिला भाजत असताना त्याच्या भोवती तेल सोडून चिला दोन्ही बाजुंनी हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावे. 

कोबीचा चिला खाण्यासाठी तयार आहे. कोबीचा चिला आपण हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

Web Title: Cabbage cheela recipe quick instant breakfast recipe How To Make Cabbage Cheela At Home Cabbage cheela Easy, quick & super healthy recipe Healthy Cabbage cheela Breakfast Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.