Lokmat Sakhi >Food > नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा

नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा

Nitin Gadkari Explains Thecha Recipe: सर्वसामान्यपणे मिरचीच्या झणझणीत ठेच्यामध्ये जो पदार्थ टाकला जात नाही, असा एक पदार्थ नितीन गडकरी त्यांच्या ठेच्यामध्ये टाकतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2024 12:07 PM2024-02-21T12:07:41+5:302024-02-21T12:08:38+5:30

Nitin Gadkari Explains Thecha Recipe: सर्वसामान्यपणे मिरचीच्या झणझणीत ठेच्यामध्ये जो पदार्थ टाकला जात नाही, असा एक पदार्थ नितीन गडकरी त्यांच्या ठेच्यामध्ये टाकतात...

Cabinet minister Nitin Gadkari explains thecha recipe, Maharashtrian traditional thecha recipe, Nitin Gadkari special thecha or green chilli chutney recipe | नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा

नितीन गडकरींनी सांगितली ठेच्याची रेसिपी, चक्क 'हा' पदार्थ घालून त्यांच्या घरी करतात ठेचा

Highlightsसर्वसामान्य घरांमध्ये ठेचा करताना जो पदार्थ मुळीच वापरत नाहीत, असा एक पदार्थ घालून त्यांच्या घरी ठेचा केला जातो.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अतिशय फूडी आहेत. वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे पदार्थ चाखून पाहाणे, त्यांचा आस्वाद घेणे, हे त्यांचे अतिशय आवडीचे काम. असा खवय्या माणूस पदार्थांच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतो. नितीन गडकरीही तसेच आहेत. बहुसंख्य महाराष्ट्रीयन लोकांना जो पदार्थ आवडतो तो म्हणजे मिरचीचा झणझणीत ठेचा (Maharashtrian traditional thecha recipe). आता ठेचा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी. पण नितीन गडकरी यांनी ठेचा करण्याची जी रेसिपी सांगितली आहे, ती खरोखरच अतिशय वेगळी असून सर्वसामान्य घरांमध्ये ठेचा करताना जो पदार्थ मुळीच वापरत नाहीत, असा एक पदार्थ घालून त्यांच्या घरी ठेचा केला जातो. (Nitin Gadkari special thecha or green chilli chutney recipe)

 

नितीन गडकरी यांनी सांगितलेली ठेचा करण्याची रेसिपी

नितीन गडकरी यांच्या घरी कोणत्या पद्धतीने ठेचा केला जातो, याची रेसिपी सांगणारा एक व्हिडिओ chef.vinayak या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

लेगिंग्ज लवकर सैल होते- गुडघ्याच्या ठिकाणी झोळ पडतो? ४ टिप्स- लेगिंग्ज खराब होणार नाही 

ठेचा करताना ते सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या, फ्रेश कोथिंबीर, लसूण, खोबरं असं सगळं तेलात छान खमंग परतून घेतात. बऱ्याच ठिकाणी खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाणे घातले जातात.

 

यानंतर परतून घेतलेले हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये टाकायचे. त्यावर थोडं लिंबू पिळायचं, थोडं मीठ टाकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात थोडी साखर टाकून ते सगळं मिश्रण ठेचून घ्यायचं. अशा पद्धतीने साखर टाकून केलेला ठेचा गडकरी यांना खूप आवडतो.

स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरून घरीच करा ब्लीच, त्वचाही चमकेल- पैसेही वाचतील

आता बहुतांश लोकांनी ठेच्यामध्ये साखर घालून तो खाल्लेला नसणार. पण एकदा नितीन गडकरी यांच्या स्टाईलने साखर घातलेला ठेचा ट्राय करून पाहायला हरकत नाही. साखर, लिंबू यामुळे ठेच्याची चव व्यवस्थित बॅलेन्स होत असेल असे वाटते. 

 

Web Title: Cabinet minister Nitin Gadkari explains thecha recipe, Maharashtrian traditional thecha recipe, Nitin Gadkari special thecha or green chilli chutney recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.