Lokmat Sakhi >Food > भरपूर कॅल्शियम असणारे हेल्दी लाडू, फक्त ३ पदार्थ आणि सोपी रेसिपी- पौष्टिक लाडू तयार

भरपूर कॅल्शियम असणारे हेल्दी लाडू, फक्त ३ पदार्थ आणि सोपी रेसिपी- पौष्टिक लाडू तयार

How to Make Calcium Laddoo: कॅल्शियमची कमतरता असेल तर औषधी- गोळ्या घेण्यापेक्षा हा चवदार लाडू खा.. चव पण बेस्ट आणि त्यातून मिळणारं पोषणही जबरदस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2022 05:09 PM2022-09-24T17:09:03+5:302022-09-24T17:09:57+5:30

How to Make Calcium Laddoo: कॅल्शियमची कमतरता असेल तर औषधी- गोळ्या घेण्यापेक्षा हा चवदार लाडू खा.. चव पण बेस्ट आणि त्यातून मिळणारं पोषणही जबरदस्त.

Calcium rich laddoo recipe: How to make calcium laddoo? Calcium laddoo recipe using just 3 ingredients | भरपूर कॅल्शियम असणारे हेल्दी लाडू, फक्त ३ पदार्थ आणि सोपी रेसिपी- पौष्टिक लाडू तयार

भरपूर कॅल्शियम असणारे हेल्दी लाडू, फक्त ३ पदार्थ आणि सोपी रेसिपी- पौष्टिक लाडू तयार

Highlightsसाधारण १०० ग्रॅम तिळातून ९०० एमजी कॅल्शियम मिळते. तर १०० ग्रॅम दुधातून १३० एमजी कॅल्शियम मिळते. दुधापेक्षाही तिळातून मिळणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण खूप अधिक आहे. 

पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळं असे सगळे पदार्थ खाण्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग शरीरात  वेगवेगळ्या खनिजांची (Calcium rich laddoo recipe) कमतरता निर्माण होते. यातला मुख्य घटक असतो तो कॅल्शियम. महिलांमध्ये तर कॅल्शियमची कमतरता (Deficiency of calcium)  खूप जास्त दिसून येते. केस गळणे, नखे तुटणे किंवा त्यांची चांगली वाढ न होणे, पाठ- कंबर आणि इतर जॉईंट्समध्ये वेदना असणे, ही सगळी कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी औषधी- गोळ्या असे कडवट  उपाय करण्यापेक्षा हा पौष्टिक लाडू खा. लहान मुलांनाही स्नॅक्सच्या डब्यात देण्यासाठी तसेच घरातल्या सगळ्यांसाठीच हा एक उत्तम उपाय आहे. ही रेसिपी chefaashti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे (How to make calcium laddoo?).

 

असे करायचे कॅल्शियम लाडू?
साहित्य

१. अर्धा कप बिया नसलेले खजूर
२. अर्धा कप तीळ
३. अर्धा कप शेंगदाणे
४. पाव टीस्पून वेलची पावडर.


रेसिपी
१. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तीळ मंद आचेवर भाजून घ्या.

९६ वर्षांच्या आजीबाईंचा दणक्यात डान्स, त्यांची नजाकत आणि ठुमक्यांवर नेटिझन्स फिदा.. व्हिडिओ व्हायरल

२. तीळ भाजून घेतल्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून घ्या. त्याचा थोडासा जाडसर कुट करून घ्या.

३. थोडंसं तूप टाकून खजूर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याच्या पेस्टमध्ये बाकीचे सगळे पदार्थ टाका. 

४. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करा. गरज पडल्यास थोडासा तुपाचा हात फिरवा आणि त्याचे लाडू करा.  

 

कॅल्शियमचे लाडू खाण्याचे फायदे
१. तीळ हा कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. साधारण १०० ग्रॅम तिळातून ९०० एमजी कॅल्शियम मिळते. तर १०० ग्रॅम दुधातून १३० एमजी कॅल्शियम मिळते. दुधापेक्षाही तिळातून मिळणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण खूप अधिक आहे. 

शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं

२. तिळातून भरपूर प्रमाणात मॅग्नेशियमही मिळते.

३. खजूरांमध्ये लोह आणि फायबर भरपूर असते.  


 

Web Title: Calcium rich laddoo recipe: How to make calcium laddoo? Calcium laddoo recipe using just 3 ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.