पालेभाज्या, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळं असे सगळे पदार्थ खाण्याकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग शरीरात वेगवेगळ्या खनिजांची (Calcium rich laddoo recipe) कमतरता निर्माण होते. यातला मुख्य घटक असतो तो कॅल्शियम. महिलांमध्ये तर कॅल्शियमची कमतरता (Deficiency of calcium) खूप जास्त दिसून येते. केस गळणे, नखे तुटणे किंवा त्यांची चांगली वाढ न होणे, पाठ- कंबर आणि इतर जॉईंट्समध्ये वेदना असणे, ही सगळी कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी औषधी- गोळ्या असे कडवट उपाय करण्यापेक्षा हा पौष्टिक लाडू खा. लहान मुलांनाही स्नॅक्सच्या डब्यात देण्यासाठी तसेच घरातल्या सगळ्यांसाठीच हा एक उत्तम उपाय आहे. ही रेसिपी chefaashti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे (How to make calcium laddoo?).
असे करायचे कॅल्शियम लाडू?साहित्य१. अर्धा कप बिया नसलेले खजूर२. अर्धा कप तीळ३. अर्धा कप शेंगदाणे४. पाव टीस्पून वेलची पावडर.
रेसिपी१. सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तीळ मंद आचेवर भाजून घ्या.
९६ वर्षांच्या आजीबाईंचा दणक्यात डान्स, त्यांची नजाकत आणि ठुमक्यांवर नेटिझन्स फिदा.. व्हिडिओ व्हायरल
२. तीळ भाजून घेतल्यानंतर त्यात शेंगदाणे टाकून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून घ्या. त्याचा थोडासा जाडसर कुट करून घ्या.
३. थोडंसं तूप टाकून खजूर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याच्या पेस्टमध्ये बाकीचे सगळे पदार्थ टाका.
४. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करा. गरज पडल्यास थोडासा तुपाचा हात फिरवा आणि त्याचे लाडू करा.
कॅल्शियमचे लाडू खाण्याचे फायदे१. तीळ हा कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. साधारण १०० ग्रॅम तिळातून ९०० एमजी कॅल्शियम मिळते. तर १०० ग्रॅम दुधातून १३० एमजी कॅल्शियम मिळते. दुधापेक्षाही तिळातून मिळणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण खूप अधिक आहे.
शांत झोपेसाठी तज्ज्ञांनी सांगितला ४- ७- ८ चा फॉर्म्युला!! बघा झोपण्यापुर्वी नेमकं काय करायचं
२. तिळातून भरपूर प्रमाणात मॅग्नेशियमही मिळते.
३. खजूरांमध्ये लोह आणि फायबर भरपूर असते.