Lokmat Sakhi >Food > भिजवलेली कणिक किती तासांनंतर वापरु नये? १ चूक आणि भिजवलेली कणिक पडते काळी..

भिजवलेली कणिक किती तासांनंतर वापरु नये? १ चूक आणि भिजवलेली कणिक पडते काळी..

Can I refrigerate my bread dough and bake it later? : मळल्यानंतर पीठ लवकर काळपट पडते? यासाठी एक खास टीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 05:30 PM2024-08-30T17:30:29+5:302024-08-30T17:31:14+5:30

Can I refrigerate my bread dough and bake it later? : मळल्यानंतर पीठ लवकर काळपट पडते? यासाठी एक खास टीप

Can I refrigerate my bread dough and bake it later? | भिजवलेली कणिक किती तासांनंतर वापरु नये? १ चूक आणि भिजवलेली कणिक पडते काळी..

भिजवलेली कणिक किती तासांनंतर वापरु नये? १ चूक आणि भिजवलेली कणिक पडते काळी..

प्रत्येकाला गरमागरम पोळ्या खायला आवडतात (Cooking Tips). गरमा-गरम पोळ्या खाल्ल्याने आपण एक पोळी एक्स्ट्रा खातो. पोळ्या खाण्याचे अनेक फायदे आहेत (Kitchen Tips). घरात जितके व्यक्ति तितक्या पोळ्या हे  गणित सर्वांच्याच घरात सामान्य आहे. बऱ्याचदा घरात एखाद व्यक्ति पोळ्या खात नाही (Chapati). ज्यामुळे कणिक शिल्लक राहते.

कणिक उरल्यानंतर आपण ते डब्यात स्टोअर करून ठेवतो. पण काही वेळानंतर कणिक काळपट पडते. शिवाय कणकेवर कडक लेअर तयार होते. कणिक साठवून ठेवल्यानंतर काळपट पडत असेल तर, कणिक या पद्धतीने साठवून पाहा. यामुळे कणिक लवकर खराब होणार नाही. शिवाय या कणकेच्या पोळ्या मऊ आणि फ्रेश तयार होतील(Can I refrigerate my bread dough and bake it later?).

कणिक साठवून ठेवताना कोणती चूक टाळावी?

- कणिक प्लॅस्टिक किंवा भांड्यात साठवून ठेवू नये. कणिक साठवून ठेवण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. सहसा गृहिणी याच पद्धतीने कणिक साठवून ठेवतात. यामुळे कणिकेमध्ये मॉइस्चर तयार होते. ज्यामुळे कणिक लवकर खराब होते. प्लॅस्टिकच्या डब्यात कणिक रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवल्याने लवकर काळपट पडते.

सायंकाळी भूक लागली की वाट्टेल ते खाता? ‘या’ ८ पैकी १ तरी पदा‌र्थ खा, प्रोटीन मिळेल भरपूर - वजनही घटेल झरझर

कणिक कोणत्या पद्धतीने फ्रीजमध्ये साठवून ठेवायचे?

फ्रीजमध्ये कणिक स्टोअर करून ठेवत असाल तर, हवाबंद डब्याचा वापर करा. असे केल्याने कणिक लवकर खराब होणार नाही. फ्रीजमध्ये कणिक साठवून ठेवले असेल तर, ७ ते ८ तासांच्या आत त्याच्या पोळ्या तयार करा. जास्त काळ कणिक स्टोअर करून ठेवू नये.

नारळ फोडणं अवघड, खोबरंही निघत नाही? १ ट्रिक, ५ मिनिटात करवंटीतून खोबरं बाहेर

कणिक काळपट पडू नये म्हणून..

कणिक लवकर खराब आणि काळपट पडू नये म्हणून, स्टोअर करण्यापूर्वी त्यावर एक तेलाचा ब्रश फिरवा. यामुळे कणिक लवकर खराब होणार नाही. शिवाय काळपटही पडणार नाही. 

Web Title: Can I refrigerate my bread dough and bake it later?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.