शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत (Peanuts). विविध पाककृतींमध्ये आपण शेंगदाण्याचा वापर करतो. किराणाच्या दुकानातून किंवा पॅकेटमधले शेंगदाणे आपण खातो (Freshness). किलोभर शेंगदाणे आणल्यानंतर त्यात काही किडलेले शेंगदाणे असतात. जे चवीला कडू लागतात. शेंगदाण्याला देखील एक्सपायरी डेट असते.
एक्सपायरी डेट उलटल्यानंतरचे शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहचू शकते. एक्सपायर्ड शेंगदाणे नेमके ओळखायचे कसे? असा प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आला असेल. बहुतांश पॅकेटमध्ये एक्सपायरी डेट लिहिलेली असते. पण जर नसल्यास काय करावे? शेंगदाणे खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहा(Can peanuts go bad? How to check their freshness).
शेंगदाणे किती दिवसात खराब होतात?
शेंगदाण्यामध्ये तेल, फ्लेव्होनॉइड्स आणि अमिनो ॲसिड असतात. त्यामुळे ते जास्त काळ ताजे राहत नाही. शेंगदाण्याची शेल्फ लाईफ जास्त नाही. पण योग्यरित्या स्टोअर करून ठेवल्यास शेंगदाणे अधिक काळ टिकतात.
मुरमुऱ्याचा मेदूवडा कधी करून पाहिलं का? १५ मिनिटांत करा झटपट पौष्टिक ब्रेकफास्ट
शेंगदाणे अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी उपाय
- शेंगदाणे नेहमी उष्णता, प्रकाश आणि आर्द्रता यापासून दूर ठेवावे. शेंगदाणे नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवा. यामुळे शेंगदाणे खराब होणार नाही. उष्ण असलेल्या जागी शेंगदाणे स्टोअर करून ठेवल्याने त्यातील तेल खराब होते, ज्यामुळे शेंगदाणे चवीला कडू लागतात.
हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवा
कोणतीही गोष्ट दीर्घकाळ ताजी ठेवण्यासाठी त्याचे हवाबंद पॅकेजिंग खूप महत्त्वाचे असते. शेंगदाणे लवकर खराब होऊ नये म्हणून, ते हवाबंद बॉक्समध्ये किंवा डब्यात स्टोअर करून ठेवा. हवेपासून संरक्षण केल्यामुळे शेंगदाण्याची चव बदलत नाही.
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा
सोललेली शेंगदाणे किंवा पीनट बटर नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. पण स्टोअर करताना हवाबंद कंटेनरचा वापर करा.
बाथरूमच्या टाईल्स घासूनही अस्वच्छ-घाणेरड्या दिसतात? बेकिंग सोड्याचा करा ‘हा’ झटपट उपाय; टाईल्स चकाचक
एक्सपायर्ड शेंगदाणे कसे ओळखायचे?
- ताज्या शेंगदाण्यांना सौम्य, नटटी गंध असतो. जर शेंगदाण्यामधून विचित्र वास येत असेल तर ते खराब झाल्याचे लक्षण आहे.
- ताज्या शेंगदाण्यांचा रंग हलका लाल आणि चमकदार असतो. जर शेंगदाण्याचा रंग फिकट किंवा बुरशी लागली असेल तर, ते खराब झाले आहेत.
- शेंगदाणे फ्रेश आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी खाऊन पाहा. खराब शेंगदाण्याची चव ही कडू असते.