चटणीचे (Chutney) अनेक प्रकार केले जातात. ताटात चटणी असेल तर, जेवण करताना आपण २ घास एक्स्ट्रा खातो. ओली आणि सुकी चटणी आपण खाल्लीच असेल. खोबऱ्याची, तिळाची, टोमॅटोची चटणी आपण आठवड्यातून २ ते ३ वेळा करतच असतो. पण ढोबळी मिरचीची चमचमीत चटणी कधी खाऊन पाहिलीय का? सिमला मिरचीची आपण भाजी, भरली ढोबळी मिरची, सिमला मिरचीचे कालवण करतोच. पण सिमला मिरचीची चटणी आपण क्वचितच खाल्ली असेल.
सिमला मिरची आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते (Capsicum Chutney). जर काही जण सिमला मिरची खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांना एकदा सिमला मिरचीची चटणी बनवून द्या (Cooking Tips). पराठा, चपाती, इडली-डोसा किंवा खिचडीसोबत ही चटणी भन्नाट लागेल(capsicum onion chutney recipe).
सिमला मिरचीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
तेल
उडीद डाळ
लांबट जांभळ्या वांग्याचे करा खमंग कुरकुरीत काप फक्त ५ मिनिटांत, जेवताना तोंडाला येईल चव
चणा डाळ
लाल सुक्या मिरच्या
जिरं
कांदे
ढोबळी मिरची
लसूण
मोहरी
कढीपत्ता
कृती
पहिले कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा चणा डाळ, २ लाल सुक्या मिरच्या, एक चमचा जिरं, कांद्याच्या फोडी, लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून भाजून घ्या. शेवटी मीठ आणि लिंबाचा रस घाला.
सुक्या भाजीत मीठ जास्तच पडलं? ५ सोप्या युक्त्या; खारटपणा होईल कमी-भाजी खाता येईल
मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं साहित्य घेऊन पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, कढीपत्ता, लाल सुकी मिरची घाला. मोहरी तडतडली की, तयार तडका चटणीवर ओतून मिक्स करा. अशा प्रकारे ढोबळी मिरचीची चटणी खाण्यासाठी रेडी.