Lokmat Sakhi >Food > गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...

गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...

Carrot Kheer Recipe : Gajar Ki Kheer : How To Make Carrot Kheer At Home : How to make indian style carrot kheer : यंदा थंडीच्या सिजनमध्ये गाजर हलव्यासोबतच गाजराच्या खिरीचा देखील बेत नक्की करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:31 IST2024-12-21T11:30:10+5:302024-12-21T11:31:34+5:30

Carrot Kheer Recipe : Gajar Ki Kheer : How To Make Carrot Kheer At Home : How to make indian style carrot kheer : यंदा थंडीच्या सिजनमध्ये गाजर हलव्यासोबतच गाजराच्या खिरीचा देखील बेत नक्की करा...

Carrot Kheer Recipe Gajar Ki Kheer How To Make Carrot Kheer At Home How to make indian style carrot kheer | गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...

गाजर हलवा तर नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात गाजराची खीर करुन तर पाहा, सुगंध-चव एकदम भारी...

गाजर वर्षभर बाजारांत विकायला असले तरीही हिवाळ्यात मिळणाऱ्या गाजरांशी त्यांची तुला होऊच नाही शकत. हिवाळ्यात मिळणारे लालचुटुक, हलक्याशा गोड चवीचे गाजर खायला सगळ्यांनाच (Carrot Kheer Recipe) आवडतात. बाजारांत अनेक ठेल्यांवर किंवा भाजीच्या टोपलीत ठेवलेले गाजर पाहून ते (Gajar Ki Kheer) विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. हिवाळ्यात अशी लालचुटुक गाजर घरी आणल्यावर त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. गाजर जितकं (How To Make Carrot Kheer At Home) फ्रेश, ताज आणि लालचुटुक असत तितकेच त्यापासून तयार केलेले पदार्थ देखील चवीला उत्तमच लागतात(How to make indian style carrot kheer).

गाजराचे लोणचे, कोशिंबीर, गाजर हलवा असे काही मोजके पदार्थ हिवाळयात सगळ्यांच्या घरी केले जातात. गाजराचा दाणेदार, गोड चवीचा गाजर हलवा तर फेमस आहेच, शिवाय हिवाळ्यात एकदा तरी गाजराच्या हलव्याचा बेत झाला नाही तर हिवाळा अधूराच वाटतो. परंतु यंदा थंडीच्या सिजनमध्ये गाजर हलव्यासोबतच गाजराच्या खिरीचा देखील बेत नक्की ट्राय करुन पाहा. ड्रायफ्रुटस, गाजर, साजूक तूप, दूध अशा नेहमीच्या उपलब्ध साहित्यात आपण गाजराची चविष्ट खीर अगदी काही मिनिटांतच पटकन तयार करु शकतो. गाजराची ही गोड,रुचकर इन्स्टंट खीर कशी तयार करायची ते पाहा.

साहित्य :- 

१. गाजर - २ कप (सालं काढून किसून घेतलेलं)
२. तांदुळ - १ टेबलस्पून (मिक्सरमध्ये वाटून जाडसर भरड केलेली)
३. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून 
४. ड्रायफ्रुट्स काप - १/२ कप (साजूक तुपात तळून घेतलेले) 
५. दूध - १/२ लिटर  
६. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
७. कंडेन्स मिल्क - २ ते ३ टेबलस्पून 

ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी...


Winter Food : गारठवणाऱ्या थंडीत खा गूळ-शेंगदाण्याचा पराठा, पोटभर नाश्ता-दिवसभर वाटेल एनर्जेटिक...

कृती :- 

१. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावीत. 
२. एका छोट्या बाऊलमध्ये तांदूळ घेऊन पाण्यात अर्धा ते पाऊण तासांसाठी भिजत ठेवावा. 
३. एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यात सर्वात आधी ड्रायफ्रुटसचे काप घालून ते हलकेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावेत. तळून घेतलेले हे ड्रायफ्रुटसचे काप बाजूला डिशमध्ये काढून गार होण्यासाठी ठेवून द्यावेत. 
४. आता त्याच पॅनमध्ये थोडेसे तूप घेऊन त्यात किसलेले गाजर ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावे. गाजर हलकेच शिजल्यावर त्यात दूध घालावे. दूध घातल्यानंतर ही खीर सतत चमच्याने हलवत राहावी. 

पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...

५. भिजवलेल्या तांदुळाची मिक्सरमध्ये वाटून थोडी जाडसर भरड करुन घ्यावी. ही तांदुळाची भरड खीर शिजत असताना त्यात घालावी. 
६. त्यानंतर चमच्याने सतत खीर ढवळत राहून सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावे. जोपर्यंत या खिरीला हलकासा दाटसरपणा किंवा क्रिमी टेक्शचर येत नाही तोपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावी. 
७. सगळ्यात शेवटी यात वेलची पूड व गोडव्यासाठी कंडेन्स मिल्क किंवा (आपल्या आवडीप्रमाणे साखर - गूळ) घालू शकता.      
८. त्यानंतर या खिरीत तळून घेतलेले ड्राय फ्रुटसचे काप वरुन घालावेत.

 गाजराची खीर खाण्यासाठी तयार आहे. ही गाजराची खीर आपण गरम किंवा थंड अशा दोन्ही प्रकारे खाऊ शकता. थंड करुन खीर खायची असल्यास ती किमान २ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवू सेट करून घ्या.

Web Title: Carrot Kheer Recipe Gajar Ki Kheer How To Make Carrot Kheer At Home How to make indian style carrot kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.