Join us  

फुलकोबी मटार बटाटा रस्सा, गावच्या लग्नात खाल्लेला चविष्ट ‘रस्सा’!- त्याची ही चमचमीत कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 5:35 PM

फुलकोबी मटार बटाटा रस्सा, हा रस्सा नुसता पदार्थ नाही. त्याला परंपरा आहे. देवळाच्या प्रांगणात, गावच्या मैदानात, लग्नाच्या तंबूत,किंवा हॉल मध्ये हा रस्सा ओरपलेले अनेक आहेत. त्या आठवणीतला हा  ‘रस्सा’!

ठळक मुद्देमऊ शिजलेला बटाटा आणि रस्सा भातात कालवून खाणे, ते पण पत्रावळीवर याला स्किल लागते.

शुभा प्रभू साटम

फुलकोबी मटार बटाटा रस्सालग्न कार्यात वेगवेगळ्या नावाच्या,टोमॅटो कांद्याच्या बेचव लगद्याने अतिक्रमण करण्याआधी, हा रस्सा हवाच असा अलिखित नियम होता. धार्मिक कार्य असल्यास कांदा लसूण टोमॅटो नाही. सौम्य वरण भाताला मसालेदार जोड. गावाकडे आणि त्यातही देशावर, किंवा पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी असा रस्सा, साधी डाळ,गोड बुंदी किंवा सोजी आणि भात.. सुटसुटीत बेत.ब्राह्मणी पद्धतीत सुके खोबरे भाजून घेतात आणि गूळ असतो. अन्य ठिकाणी काळा मसाला. फ्लॉवर आणि मटार या भाज्या तश्या महाग. मग बटाटे येतात. मुळात या रश्शाची चवच इतकी खमंग असते, की फ्लॉवर मटार अनुपस्थिती, अभाव जाणवत नाही. मऊ शिजलेला बटाटा आणि रस्सा भातात कालवून खाणे, ते पण पत्रावळीवर याला स्किल लागते. गावजेवणात नेहमी उपस्थित असणाऱ्या थोर चतुर लोकांना वेगळ्याने सांगायला नको. कोकणात माझ्या गावी तरबेज खेळाडू पहिल्या पंगतीत जागा पटकावयचे, ते स्वयंपाक होतो त्याजवळच. म्हणजे वाढपी भांडे भरून आले, की पहिल्यांदा यांच्या वाट्याला रस्ता भातासोबत हा रस्सा ओरपून झाला, की मग द्रोणात ओतून नुसता प्यायचा.कारण त्यातील फ्लॉवर मटार आणि बटाटा धारातीर्थी पडून, निव्वळ रस्सा उरायचा. वाढपी तो संपवण्याच्या मागे. शेवटी असल्यास ताक किंवा मठ्ठा.हा रस्सा नुसता पदार्थ नाही. त्याला परंपरा आहे. देवळाच्या प्रांगणात, गावच्या मैदानात, लग्नाच्या तंबूत,किंवा हॉल मध्ये हा रस्सा ओरपलेले अनेक आहेत. मी त्यातील एक..त्याकरता हा रस्सा बेत.तर हा रस्सा कसा कराल?

(छायाचित्र : शुभा प्रभू साटम)

कृती

सुके खोबरे भाजून+आले गुळगुळीत वाटून.फोडणीत्यात फ्लॉवर +मटार+ बटाटाहळद+ तिखट+ काळा/गोडा मसाला +मीठ +गरम पाणी ,बोटचेपे शिजवून.आता खोबरे वाटण,गूळ ,एक उकळी.झाला रस्सा तयार!

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्न