Join us  

सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात नारळ फोडण्याची एकदम सोपी युक्ती, बघा भन्नाट आयडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 2:35 PM

How To Cut Coconut Easily: नारळ फोडणं हे महाकठीण काम. हेच काम साेपं कसं करायचं, याविषयी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Celebrity Chef Kunal Kapur) यांनी एक खास ट्रिक सांगितली आहे.

ठळक मुद्देनारळ फोडायला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच तर तुमचं हेच काम सोपं करण्याची सोपी ट्रिक सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितली आहे

पुजेतलं किंवा ओटीमध्ये मिळालेलं नारळ घरी आलं की ते कितीतरी दिवस घरात तसंच लोळत पडतं. कारण ते नारळ कसं फोडायचं हा अनेकींपुढचा प्रश्न असतो. बाकी फळांचं सोपं असतं. चिरलं- कापलं की लगेच खाता येतं. पण नारळ फोडायला मात्र चांगलीच मेहनत घ्यावी लागते. म्हणूनच तर तुमचं हेच काम सोपं करण्याची सोपी ट्रिक सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ( Kunal Kapur) यांनी सांगितली आहे (simple trick for cutting coconut perfectly and easily). यासाठी तुम्हाला अजिबातच जास्त मेहनत घेण्याची गरज नाही.

 

नारळ फोडण्याची सोपी युक्ती१. कुणाल कपूर सांगतात सगळ्यात आधी नारळ सोलून घ्या.

२. त्यानंतर नारळावर तीन रेघा अगदी स्पष्ट दिसतील, त्या रेघांवर मुसळीने किंवा लाटण्याचे मारा.

पीसीओएसचा खूपच त्रास होतो? तज्ज्ञ सांगतात ३ नियम पाळणं ठरेल फायदेशीर- त्रास होईल कमी 

३. प्रत्येक रेघेवर दोन- तीन वेळा मारलं की नारळ मधोमध फुटला जाईल.

४. आता नारळ तर फुटला पण त्याच्या टणक आवरणातून खोबरं वेगळं करणं हे देखील मोठं कठीण काम असतं.

 

५. खोबरं काढताना बऱ्याचदा हाताला चाकू किंवा इतर धारदार वस्तू लागूही शकते. त्यामुळे नारळातून खोबरं काढण्याचीही एक युक्ती कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे.

आलियाची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय पाणी पिण्याची योग्य पद्धत, तुम्हीही या चुका करत असाल तर सावधान!

६. त्यासाठी गॅस सुरू करा. गॅसवर एक जाळी ठेवा. पापड भाजण्याची जाळीही चालेल. या जाळीवर नारळाचे दोन्ही मधोमध फुटलेले भाग ठेवा. ३० ते ३५ सेकंद ते गॅसवर चांगले भाजून घ्या. 

७. त्यानंतर नारळ गरम असतानाच ते एका जाडसर कपड्याने पकडा. आणि चाकू वापरून खोबरं काढून घ्या. अगदी चटकन खोबरं वेगळं होईल. करून पाहा हा प्रयोग एकदा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सकुणाल कपूर