Lokmat Sakhi >Food > शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

Chef Kunal Kapur Shares Tips To Make Perfect Crispy Paratha At Home : कितीही प्रयत्न केला तरीही ढाबा स्टाईल क्रिस्पी, खुसखुशीत पराठा बनत नाही, या घ्या सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 06:30 PM2023-10-04T18:30:39+5:302023-10-04T18:45:41+5:30

Chef Kunal Kapur Shares Tips To Make Perfect Crispy Paratha At Home : कितीही प्रयत्न केला तरीही ढाबा स्टाईल क्रिस्पी, खुसखुशीत पराठा बनत नाही, या घ्या सोप्या टिप्स...

Celebrity Chef Kunal Kapur Shares Tips To Make Perfect Crispy Parotta. | शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

'पराठा' हा असा एकमेव पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो. आपल्याकडे बरेचदा सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणाला अशा दोन्ही वेळेला पराठा आवडीने खाल्ला जातो. मूळचा पंजाबी असलेला हा पदार्थ जगभरात देखील तितक्याच आवडीने खाल्ला जातो. घरातील बरेचजण किंवा लहान मुलं अनेकदा नावडती भाजी असली की न खाण्यासाठी नाकं मुरडतात. अशावेळी त्याच भाज्यांचे स्टफिंग तयार करुन त्याचे पराठे करुन खाल्ल्यास पौष्टिक व सात्विक आहारही पोटात जाईल शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातील. असा हा पराठा आपल्यात सगळं काही सामावून घेत अधिक हेल्दी व चविष्ट बनतो. हे गरमागरम पराठे नारळाच्या चटणीसोबत किंवा दही, सॉससोबत खाण्यासाठी चांगले लागतात(Here’s How To Make Dhaba-Style Paratha At Home). 

काही पराठयांचें प्रकार असे असतात की जे बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत. चपाती सारखे गव्हाचे कणिक मळून त्याच्या आत आपल्याला हवे तसे भाज्यांचे स्टफिंग भरून पौष्टिक पराठा बनवता येतो. काहीवेळा या पराठ्यांमध्ये कोणत्याही भाजीचे स्टफिंग नसले तरीही आपण फक्त घरात उपलब्ध असणाऱ्या मसाल्यांचा वापर करून देखील चटकन मसालेदार पराठा बनवू शकतो. पराठा खाताना तो जरा मसालेदार, चटपटीत, क्रिस्पी असेल तरच खायला मजा येते. घरच्या घरी हॉटेल स्टाईल क्रिस्पी पराठे बनवण्यासाठी सुप्रसिद्ध शेफ कुणाल सांगतोय काही खास (6 tips to make crispy parathas) टिप्स. या टिप्स नेमक्या कोणत्या ते पाहूयात(How To Make Lachha Paratha Crispy Chef Kunal Kapur Shares Tips).

पराठा अधिक क्रिस्पी होण्यासाठी सोप्या टिप्स... 

१. जर आपल्याला पराठा अधिक क्रिस्पी हवा असेल तर तो तव्यावर शेकताना उलथण्याने थोडासा दाब देत शेकून घ्यावा. यामुळे पराठ्याला व्यवस्थित शेक मिळून तो अधिक क्रिस्पी होण्यास मदत होते. 

२. याउलट जर आपल्याला पराठा मऊ, लुसलुशीत हवा असेल तर तो शेकताना जास्त दाबून शेकू नये. यामुळे पराठा जास्त क्रिस्पी न होता सॉफ्ट, लुसलुशीत होतो. 

मशीनचा वापर न करताच घरच्या घरी बनवा विकतसारखे स्पायरल पोटॅटो, चमचमीत, मसालेदार तोंडाला सुटेल पाणी...

३. पराठा अधिक चविष्ट किंवा खाताना टेस्टी लागण्यासाठी तो दोन्ही हातात घेऊन हलक्या हाताने दाब देत तो थोडासा कुस्करुन घ्यावा, यामुळे पराठा खाताना तो अधिक टेस्टी लागतो. 

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

थालीपीठाची भाजणी संपली ? भाजणी शिवाय बनवा अगदी १० मिनिटांत कारवार स्पेशल रवा थालीपीठ....

४. पराठा क्रश करताना आपण एका किचन टॉवेलमध्ये हा गरमागरम पराठा ठेवून क्रश करु शकता. 

वडापावच्या गाड्यावर मिळते तशी सुकी लाल चटणी घरी बनवण्यासाठी वापरा १ सिक्रेट पदार्थ, चव अशी की...

५. एकदा बनवून ठेवलेला पराठा खाताना पुन्हा गरम करण्यासाठी री - हिट करताना एक किचन टॉवेल घेऊन ते पाण्यांत बुडवून मग व्यवस्थित पिळून घ्यावे. त्यानंतर या ओल्या कापडामध्ये पराठा ठेवून तो मायक्रोव्हेव मध्ये ३ ते ५ सेकंदांसाठी ठेवून गरम करून घ्यावा. यामुळे थंड झालेला पराठा देखील पुन्हा गरम करून खाता येतो. 

६. जर आपण बाजारांतून फ्रोझन पराठ्यांचे पाकीट विकत आणले असेल तर हे पराठे खाण्यासाठी भाजून घेण्यापूर्वी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात बुडवून लगेच पाण्याबाहेर काढून तव्यावर शेकून घ्यावे. यामुळे बाहेरून विकत आणलेले फ्रोझन पराठे खाताना अधिक चविष्ट व क्रिस्पी लागतात.

Web Title: Celebrity Chef Kunal Kapur Shares Tips To Make Perfect Crispy Parotta.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.