खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. दिवसभर आपण जे खातो आणि पितो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की सकस आहारासोबतच खाण्याच्या वेळेकडे लक्ष देणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर, कधीकधी चुकीच्या वेळी पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानेही तुमच्या शरीराला फायदा होत नाही. उलट चुकीच्या वेळी खाल्लेल्या पदार्थांमुळेही नुकसान होऊ शकतं. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी एका पॉडकास्टमध्ये याबद्दल माहिती दिली. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर यासंबंधी अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये, त्यांनी अशा ३ गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्या सामान्यतः आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जातात परंतु रात्रीच्या वेळी त्या टाळल्या पाहिजेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...
'या' ३ गोष्टी खाऊ नका रात्री
सॅलड
आजच्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली, बहुतेक लोकांना रात्रीच्या जेवणात सॅलड खायला आवडतं. सॅलड आरोग्यासाठी चांगलं आहे, पण रात्री ते खाणं टाळावं. न्यूट्रिशनिस्टच्या मते, कच्च्या भाज्या पचायला खूप वेळ लागतो, त्यामुळे रात्री त्या खाल्ल्याने गॅस आणि अपचनसारख्या पोटाशी संबंधीत समस्या उद्भवू शकतात.
फळं
फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र न्यूट्रिशनिस्ट रात्री कोणतंही फळ न खाण्याचा सल्ला देतात. फळांमध्ये एक्टिव्ह एंजाइम असतात, जे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढवतात. रात्री तुम्हाला या एनर्जीची आवश्यकता नाही. याशिवाय फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर रात्रीच्या वेळी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत न्यूट्रिशनिस्ट संध्याकाळी ५ नंतर फळ न खाण्याचा सल्ला देतात.
स्टार्च असलेलं अन्न
या सर्वांव्यतिरिक्त, न्यूट्रिशनिस्टने रात्रीच्या वेळी स्टार्च असलेलं अन्न न खाण्याचा सल्ला देतात. फळं आणि सॅलड व्यतिरिक्त, स्टार्चयुक्त पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात. रात्री खाल्ल्यास या गोष्टी तुमचं अधिक नुकसान करू शकतात. रात्रीचे जेवण खूप हलकं ठेवण्याचा सल्ला न्यूट्रिशनिस्ट देतात. तुम्ही रात्रीच्या जेवणात खिचडी खाऊ शकता.