चहा म्हणजे अनेकांसाठी जणू एनर्जी बुस्टर डोस असतो. सकाळचा चहा आणि दुपारचा चहा तर अगदी पाहिजेच पाहिजे. त्याशिवाय कशी पुढच्या कामांना एनर्जी मिळत नाही. आता नुसतंच पाणी उकळून आणि दूध घालून चहा करण्यापेक्षा त्याच्यात जर खास मसाला टाकला तर चहाची चव तर मस्त होईलच, पण तो अधिक सुगंधीही होईल. शिवाय मसाल्यातल्या पदार्थांमुळे त्यांची पौष्टिकताही आणखी वाढेल (simplest method of making chai masala). असा फक्कड चवीचा, सुगंधी आणि गुणकारी चहा करण्यासाठी हा एक खास चहा मसाला तुमच्या घरी करून ठेवा. (chaha masala recipe in marathi)
चहा मसाला करण्याची सोपी रेसिपी
चहा मसाला कसा करावा, याची रेसिपी Cooking ticket marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
अर्धा टेबलस्पून लवंग
पावसाळ्यात डास वाढले- कडाकड चावतात? 'हे' जादुई पाणी अंगाला लावा, डास चार हात लांब राहतील...
१ टेबलस्पून मिरे
दालिचनीचे दोन छोटे तुकडे
२ टेबलस्पून वेलची
२ मसाला वेलची
अर्धे जायफळ
काळपट, कोरडे ओठ होतील गुलाबी आणि लोण्यासारखे मऊ, बघा १ खास उपाय- लिपस्टिकची गरजच नाही
२ चमचे सुंठ पावडर
अर्धा चमचा ज्येष्ठमध पावडर
२ चमचे बडिशेप
खडीसाखरेचा एक लहान खडा
कृती
सगळ्यात आधी लवंग, वेलची, मिरे, दालचिनी, जायफळ, बडिशेप कढईमध्ये टाकून मंद आचेवर थोडे भाजून घ्या.
त्यामध्ये मसाला वेलचीही टाकावी. पण तिची टरफलं काढून टाका.
ॲवॉर्ड सोहळ्यानंतर थेट दवाखान्यात जाऊन पहिला केमो घेतला, हिना खान सांगते मी पक्क ठरवलं आहे की.....
मसाले भाजून झाल्यानंतर ते पुर्णपणे थंड होऊ द्या. यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यामध्ये ज्येष्ठमधाची पावडर, सूंठ पावडर, खडीसाखरेचा खडा टाका आणि सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून त्याची अगदी बारीक पावडर करून घ्या. हा झाला तुमचा चहा मसाला तयार.
चहा करण्यासाठी पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात हा १ टीस्पून मसाला तसेच चहा पावडर आणि साखर टाकून उकळून घ्या. अगदी व्यवस्थित खळखळ उकळून झाल्यानंतर त्यात दूध टाका. तुम्ही टपरीवर पिता तसा अतिशय सुगंधी आणि चवदार चहा घरीच तयार होईल.