सकाळच्यावेळी भरपूर लागलेली असते आणि नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न अनेकांना पडतो. नाश्त्याला खाण्यासाठी चहा चपाती (Chaha Chapati) हा पर्याय सर्वांनाच उत्तम वाटतो. सकाळच्यावेळी भाजी चपाती नेहमीच बनवली जाते. चहाबरोबर चपात्या खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. (Chai Chapati in Breakfast Is it Good For Health Or Not) पण आयुर्वेदानुसार चहा-चपाती खाण्याचे हे कॉम्बिनेशन तब्येतीसाठी नुकसान कारक ठरू शकतं. चहा चपाती खाताना काही बेसिक टिप्स लक्षात घ्यायला हव्यात. डॉ. मानसी मेहेंदळे-धामणकर यांनी इंस्टाग्राम पोस्ट करून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Is it Good To Eat Chai Chapati Know dr openion)
चहा चपाती खाण्याबाबत डॉक्टर काय सांगतात?
या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलंय की, तुम्हीसुद्धा चहाबरोबर पोळी बुडवून खाता का, पोळी एकत्र चावून खाल्ल्याने लाळेतली संयोगाने शरीरातील कफ वाढून कफ विकार निर्माण होतात. गहू आणि दूध एकत्र खाल्ल्यास सतत जळजळ होणं, केस पांढरे होणं, सर्दी होणं, त्वचेला खाज येणं, अंगाचा स्पर्श उष्ण वाटणं अशी लक्षणं दिसून येतात. मानेवर काळे चट्टे येतात. चहा-पोळी हे विरुद्ध अन्न आहे.
चपाती गव्हापासून तयार झालेली असते यात जास्तीत जास्त कॅलरीज असतात. चपातीबरोबर खाण्यासाठी लोक खूप गोड चहा बनवतात. यात हाय कॅलरीज असतात. म्हणून चहाबरोबर चपातीचे सेवन केल्यानं वजन वाढण्याचा धोका असतो. जर चहासोबत चपाती खात असाल तर झोप यायला समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. साखरेने आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. रोज चहा-चपाती खाल्ल्याने हृदयाच्या गतीवर परिणाम होतो. पचनाच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही चहासोबत चपाती खाण टाळायला हवं.
मुलांची बुद्धी-स्मरणशक्ती कशी वाढवाल? रामदेव बाबांच्या खास टिप्स; IQ वाढेल-बुद्धी तल्लख होईल
बीएके सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील आहारतज्ज्ञ सुनिता राय चौधरी सांगतात की, नाश्त्याला चहाबरोबर चपाती खाणं नुकसानकारक ठरू शकतं. ज्यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळते पण इतर महत्वाची पोषक तत्व मिळत नाहीत. नाश्त्यातून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात शरीराला मिळतील असे पाहा. चहा आणि चपाती खाल्ल्याने कॅल्शियम, आयर्न आणि कार्बोहायड्रटेस योग्य प्रमाणात मिळत नाहीत