Join us  

Chakali Recipe: १५ मिनिटांत करा गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली; तेलात न फुटणारी-कमी तेलकट खमंग चकली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 3:48 PM

Chakali Recipe in Marathi (Chakali Kashi Karaychi) : गव्हाच्या पिठाची चकलीसुद्धा खमंग, स्वादीष्ट बनते. ही चकली करायलाही सोपी आहे

दिवाळीच्या (Diwali Faral) फराळात  चकली हा सर्वांचाच आवडता पदार्थ असतो. फराळाचं ताट समोर आलं की आधी चकली शोधणारे बरेचजण असतात. कुरकुरीत खमंग चकली खायला सर्वांनाच आवडते. (Cooking Hacks) भाजणीची चकली करायची म्हटलं की खूप प्रोसेस फॉलो कराव्या लागतात. भाजणीची चकली करण्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाची चकली बनवू शकता. गव्हाच्या पिठाची चकलीसुद्धा खमंग, स्वादीष्ट बनते. (Diwali Special Wheat Chakali Recipe) विशेष म्हणजे ही चकली करायलाही सोपी आहे. यासाठी गव्हाच्या पिठासोबतच किचनमध्ये उपलब्ध असणारं बेसिक साहित्य लागेल. (Wheat Chakali Recipe)

गव्हाच्या पिठाची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य (Wheat Chakali Making Steps)१) गव्हाचं पीठ - २ कप

२) तांदूळाचं पीठ- अर्धा कप

३) हळद पावडर- अर्धा चमचा

४) लाल मिरची पावडर- अर्धा चमचा

५) धणे पावडर - १ छोटा चमचा

६) ओवा -  १ छोटा चमचा

७) मीठ - चवीनुसार

८) पांढरे तीळ -१ मोठा चमचा

९) मोहनासाठी तेल - गरजेनुसार

१०) हिंग- चुटकीभर

११) तळण्ययासाठी तेल -गरजेनुसार

गव्हाच्या पिठाची चकली करण्याची कृती (How To Make Crispy Wheat Chakali)

१) एका कापडात गव्हाचं पीठ आणि तांदूळाचं पीठ घेऊन व्यवस्थित बांधून घ्या नंतर एक पोटली तयार करा. पिठाची पोटली बांधून कुकरच्या डब्यात वाफेवर शिजवण्यासाठी ठेवा. १५ मिनिटांसाठी बिना शिट्टीचं हे पीठ शिजवून घ्या.

डोसा तव्याला चिकटतो-हॉटेलसारखा परफेक्ट जमत नाही? डाळतांदूळ वाटताना १ ट्रिक वापरा, डोसा होईल ए वन

२) कुकर उघडल्यानंतर तुम्हाला १५ मिनिटांनी पीठ घट्ट झालेलं दिसून येईल. तुम्ही हे पीठ मोकळं करण्यासाठी मिक्सरमध्ये घालून बारीक करू शकता नंतर गाळणीनं गाळून घ्या.

३) या पिठात हळद पावडर, लाल मिरची पावडर, धणे पावडर, ओवा, तिळ, हिंग आणि मीठ घालून सर्व जिन्नस  एकत्र करा. नंतर त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या. पिठात एकत्र सगळं पाणी घालू नका अन्यथा चकलीचं पीठ वाया जाईल. गरजेनुसार कमीत कमी पाणी घाला.

पातळ पोह्यांचा चिवडा करण्याची खमंग रेसिपी, चिवडा होईल कुरकुरीत-पावसाळी हवेतही सादळणार नाही

४) चकलीच्या साच्याचाला तेल लावून घ्या. आतमध्ये पीठ चिकटणार नाही याची काळजी घ्या. नंतर एकावेळी  साचात मावेल इतकं पीठ तोडून ते हातानं एकजीव करून चकलीच्या साच्यात घाला आणि झाकण घट्ट बंद करा. एका पेपरवर छोट्या छो्टया आकाराच्या चकल्या पाडून घ्या आणि चकलीचा आकार व्यवस्थित पाडून झाल्यानंतर  दोन्ही बाजूची टोकं दाबून बंद करा ज्यामुळे चकली तेलात वेगळी होणार नाही.

५) कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर चकली घालून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. तेल शोषून घेईल अशा पेपरवर चकल्या काढा. याच पद्धतीनं सर्व चकल्या पेपरवर काढून घ्या. गार झाल्यानंतर चकल्या तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता.  या चकल्या तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी