Lokmat Sakhi >Food > वाटीभर गव्हाच्या पीठाची करा खुसखुशीत चकली; काटेरी-खमंग चकली करण्याची झटपट रेसिपी

वाटीभर गव्हाच्या पीठाची करा खुसखुशीत चकली; काटेरी-खमंग चकली करण्याची झटपट रेसिपी

Chakli Recipe With Step By Step Method : चकली बनवण्यासाठी भाजणीचे साहित्य तयार करणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:17 AM2023-09-26T11:17:39+5:302023-09-26T12:58:23+5:30

Chakli Recipe With Step By Step Method : चकली बनवण्यासाठी भाजणीचे साहित्य तयार करणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं.

Chakli Recipe With Step By Step Method : Maharashtrian Chakli Recipe How to make chakali | वाटीभर गव्हाच्या पीठाची करा खुसखुशीत चकली; काटेरी-खमंग चकली करण्याची झटपट रेसिपी

वाटीभर गव्हाच्या पीठाची करा खुसखुशीत चकली; काटेरी-खमंग चकली करण्याची झटपट रेसिपी

चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मधल्यावेळेत खाण्यासाठी काहीतरी खमंग, कुरकुरीत पदार्थ असेल तर खाण्याची मजाच काही वेगळी. नेहमी नेहमी बाहेरचे तेलकट पदार्थ  खाल्ले तर खोकला, कफ होण्याची शक्यता असते. (Maharashtrian Chakli Recipe ) त्यापेक्षा घरीच अगदी कमीत कमी साहित्यात तुम्ही चकली बनवू शकता. चकली बनवण्यासाठी भाजणीचे साहित्य तयार करणं म्हणजे खूपच किचकट काम वाटतं. घरच्याघरी सोप्या पद्धतीने भाजणी तयार न करता गव्हाच्या पीठाची चकली कशी बनवायची ते पाहूया. (How to make chakali at home)

साहित्य

१)  मूग डाळ-  १ कप

२) पाणी- २ कप

३) हळद-  १ चमचा

४) हिंग- अर्धा चमचा

५) गव्हाचं पीठ- ४ कप

६) लाल तिखट- १ टिस्पून

७) ओवा- १ चमचा

८) तीळ- २ टिस्पून

९) धणे पावडर- १ टिस्पून

१०) पाणी - गरजेनुसार

११) मीठ - चवीपुरता.

१२) तेल - तळण्यासाठी

कृती

१) गव्हाच्या पीठाची चकली बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी मुगाची डाळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर  त्यात पाणी, हळद आणि मीठ घालून २० मिनिटं शिजवून घ्या.  एका रूमालात ३ ते ४ वाटी गव्हाचं पीठ घालून  रूमाल घट्ट बांधून घ्या आणि पीठ वाफेवर शिजवण्यासाठी ठेवा. १५ ते २० मिनिटं शिजवून वाफ काढून घ्या. गव्हाचं पीठ शिजवण्याासाठी तुम्ही इडलीचा कुकरही वापरू शकता.

२) त्यानंतर शिजवलेली डाळ बाहेर काढून घोटून घ्या. घोटलेली डाळ गाळणीच्या साहाय्याने गाळून जाडसर पेस्ट वाटीत काढून घ्या.  त्यानंतर गव्हाच्या पीठाच्या रूमालाची गाठ सोडून हे पीठ मोकळे करा. हे पीठ हाताने मोकळे करून चाळून घ्या.  या पीठात मूग डाळ, लाल तिखट, जीरं, गरम मसाला, हळद, ओवा, जीरं, हिंग, धणे पावडर, तीळ घालून एकजीव करून घ्या.  सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर पीठाचा जाडसर गोळा तयार करा. 

उरलेल्या भाताचा करा मऊ- मोकळा फोडणीचा भात, पाहा १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे

३) पीठ मळताना लागेल तसं कमीत कमी पाणी घालून घट्ट गोळा मळून  घ्या. जर तुम्ही त्यात जास्त पीठ घातले तर पीठ वाया जाऊ शकतं. कारण सैल पीठाच्या चकल्या व्यवस्थित येत नाही. पीठ जास्त घट्ट असेल तर चकली साच्यातून बाहेर पडणार नाही.

वरण-भाताबरोबर खायला पटकन करा खमंग बटाटा फ्राय; सोपी रेसिपी, साध्या जेवणाची वाढेल चव

म्हणून चकलीच्या पीठाची मध्यम कंसिस्टंसी ठेवा.  चकलीच्या साच्यात मावेल इतकं पीठ  घालून  गोलाकार  चकली करा. १० ते १२ चकल्या तयार केल्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर  त्यात चकल्या खमंग, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 

Web Title: Chakli Recipe With Step By Step Method : Maharashtrian Chakli Recipe How to make chakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.