शाकाहारी लोकांसाठी राजमा हा प्रोटीन्सचा अतिशय उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये राजम्याची उसळ, राजमा चावल हा बेत नेहमीच केला जातो. या पदार्थाची तीच ती एकसारखी चव घेऊन कधीतरी कंटाळा येतोच. म्हणूनच आता अतिशय वेगळ्या पद्धतीने राजमा करून पाहा (chamba ka rajma recipe). ही रेसिपी हिमाचल प्रदेशची असून तिथे तो 'चंबा का राजमा' या नावाने ओळखला जातो. अभिनेत्री यामी गौतम (yami gautami's favourite recipe) हिचा हा पदार्थ अतिशय आवडीचा असून तो नेमका कशा पद्धतीने करायचा ते पाहा. (how to make rajma chawal?)
यामी गौतमच्या आवडीचा 'चंबा का राजमा' करण्याची रेसिपी
साहित्य
वाटीभर दही
अर्धी वाटी राजमा
१ टीस्पून हळद
२ टीस्पून धनेपूड- जिरेपूड
हात- पाय बारीक पण पोट फार सुटलं? बघा तुळस- दालचिनीचा खास उपाय, सुटलेलं पोट होईल सपाट
१ टेबलस्पून कसूरी मेथी
१ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून तूप
केस गळणं थांबेना? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात रोज 'ही' पावडर चिमूटभर खा, ८ दिवसांतच केस गळणं कमी
१ ते २ तेजपान
१ वाळलेली लाल मिरची
१ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
२ टीस्पून आलं- लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी राजमा ७ ते ८ तास भिजवून घ्या आणि त्यानंतर तो कुकरमध्ये टाकून शिजवून घ्या.
२. यानंतर वाटीभर दही एका भांड्यात घ्या. त्यामध्ये धनेपूड, जीरेपूड, तिखट, गरम मसाला, कसूरी मेथी आणि थोडं दही टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि अर्ध्या ते पाऊण तासासाठी झाकून ठेवा.
सीटचा भाग खूपच वाढला? आलिया- करिनाची फिटनेस ट्रेनर सांगतेय व्यायाम, बेढब शरीराला येईल आकार
३. यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात तूप टाकून फोडणी करून घ्या, तेजपान आणि वाळलेल्या मिरच्या घाला. नंतर कांदा टाकून परतून घ्या. कांदा परतून झाला की आलं- लसूण पेस्ट टाकून परतून घ्या.
४. यानंतर त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं दही आणि राजमा घाला.
५. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. चवीनुसार तिखट, मीठ घाला आणि छान वाफ येऊ द्या. सगळ्यात शेवटी गॅस बंद केल्यावर कोथिंबीर घाला. पुन्हा एकदा झाकण ठेवून द्या. जेणेकरून सगळे मसाले छान सेट होतील आणि राजम्याला छान स्वाद येईल. हा गरमागरम राजमा भात, पोळी, भाकरीसोबत खाऊ शकता.