Lokmat Sakhi >Food > चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

Champa shashti 2024: चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला अनेक ठिकाणी वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवला जातो. अस्सल मराठमोळ्या जेवणाची खास झणझणीत जादू. (Champa shashti Naivedya baingan bharta recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2024 03:02 PM2024-12-06T15:02:30+5:302024-12-06T15:26:32+5:30

Champa shashti 2024: चंपाषष्ठीनिमित्त खंडोबाला अनेक ठिकाणी वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवला जातो. अस्सल मराठमोळ्या जेवणाची खास झणझणीत जादू. (Champa shashti Naivedya baingan bharta recipe)

Champa shashti Naivedya, Champa shashti 2024, how to make baingan bharta, most easy and very tasty recipe of making baingan bharta, vangyacha bharit recipe in marathi | चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

चंपाषष्ठी नैवेद्य: अस्सल गावरान पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत आणि भाकरी, या जेवणाची सर कशाला नाही..

Highlightsआता ७ डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीनिमित्त या रेसिपीने वांग्याचं भरीत करून पाहा. घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल.

प्रत्येक सणाला एका खास पदार्थाचे महत्त्व असते. त्यावरूनच तर आपली खाद्यसंस्कृती किती समृद्ध आहे हे लक्षात येते. लवकरच येणाऱ्या संक्रांतीला तीळगुळाचे महत्त्व असते तर नागपंचमीला पुरणाचे दिंड असतात. एरवी काही सणांना आवर्जून पुरणपोळी केली जाते. आता तसेच चंपाषष्ठीनिमित्त एरवी कधीच कोणत्याच नैवेद्यामध्ये नसलेल्या एका खास पदार्थाला महत्त्व असते आणि तो पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत सहसा कोणत्या नैवेद्यामध्ये नसतं. पण चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या पानात जोपर्यंत भरीत वाढलं जात नाही तोपर्यंत तो नैवेद्य पुर्ण नसतो (Champa shashti Naivedya). म्हणूनच आता ७ डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीनिमित्त या रेसिपीने वांग्याचं भरीत करून पाहा (Champa shashti Naivedya baingan bharta recipe).. घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल.(vangyacha bharit recipe in Marathi)

 

वांग्याचं झणझणीत भरीत करण्याची अस्सल गावरान पद्धत

 

साहित्य 

१ मोठं भरीताचं वांगं

२ मध्यम आकाराचे कांदे

२ ते ३ हिरव्या मिरच्या

मुळ्याचं चटपटीत लोणचं करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, चव एवढी भारी की इतर सगळी लोणची विसराल..

६ ते ७ लसूण पाकळ्या

१ टेबलस्पून तेल

फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट

 

कृती

सगळ्यात आधी तर वांगं व्यवस्थित धुवा आणि स्वच्छ पुसून कोरडं करा.

त्यानंतर वांग्याला बाहेरच्या बाजुने तेल लावून घ्या.

सुकून गेलेल्या रोपालाही फुटतील नवी पाने, किचनमधले २ पदार्थ वापरा- काही दिवसांतच रोप होईल हिरवेगार

आता वांग्याला सुरीच्या साहाय्याने छोटे छोटे छेद द्या आणि त्यामध्ये लसूण, मिरच्या खोचा. आता हे भरीत थेट गॅसवर भाजायला ठेवा.

अधून मधून हलवत राहून भरीत खरपूस भाजून घ्या. त्यानंतर वांगं थोडं थंड होऊ द्या.

 

आता एवढं झाल्यानंतर २ पद्धतींनी भरीत करता येतं. काही जण भाजून घेतलेलं वांगं तसंच ठेचून त्यात कच्चा बारीक चिरलेला कांदा टाकतात. कांदा आणि वांगं छान एकजीव करून त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर, दाण्याचा कूट आणि कच्चं तेल घालतात. तुम्ही या पद्धतीनेही भरीत करू शकता.

नवरदेव- नवरीसाठी घ्या नव्या पद्धतीच्या मुंडावळ्या, पाहताक्षणीच आवडणारे ७ स्वस्त आणि सुंदर डिझाईन्स...

भरीत करण्याची दुसरी पद्धत म्हणजे कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर फोडणी करून घ्या. त्यामध्ये कांदा आणि भाजून घेतलेलं वांगं परतून घ्या. दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून सगळ्यात शेवटी कोथिंबीर घाला आणि वाफ येऊ द्या.. यापैकी जी रेसिपी तुम्हाला आवडेल त्या रेसिपीनुसार भरीत करून पाहा. 

 

Web Title: Champa shashti Naivedya, Champa shashti 2024, how to make baingan bharta, most easy and very tasty recipe of making baingan bharta, vangyacha bharit recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.