चपाती हा एक असा पदार्थ आहे, जो जवळपास प्रत्येक घरात तयार होतो. काही ठिकाणी याला चपाती, पोळी किंवा रोटी म्हणतात. भाजी आणि डाळ चपातीशिवाय अपूर्ण आहे. काही लोकं सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळात चपाती खातात. परंतु, अनेकदा एक्स्ट्रा चपाती उरते. घरात शिळी चपाती कोणी खात नाही.
अशावेळी शिळ्या चपातीचं करायचं काय असा प्रश्न मनात येतो. आपण शिळ्या चपातीचा चिवडा, लाडू, भजी खाल्लीच असेल. पण कधी चपाती चाट खाऊन पाहिलं आहे का? शिळ्या चपातीला कडक करून आपण त्याला चाटचा ट्विस्ट देऊ शकता. चला तर मग चपाती चाट ही रेसिपी तयार कशी करायची हे पाहूयात(Chapati Chat Recipe/ Leftover Chapati Recipe/ Easy Snacks Recipe).
शिळ्या चपातीचा चाट करण्यासाठी लागणारं साहित्य
शिळी चपाती
तूप
मीठ
लाल तिखट
टॉमेटो
छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू
कांदा
कोथिंबीर
शेव
कृती
सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर शिळी चपाती गरम करा. किचन नॅपकिनने हलक्या हाताने चपाती दाबून दोन्ही बाजूने शेका. यामुळे चपाती कडक होईल. कडक झालेली चपाती एका प्लेटवर ठेवा. त्यावर अर्धा चमचा तूप, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून ब्रशने साहित्य चपातीवर पसरवा.
न वाफवता करा दुधी भोपळ्याची वडी, नावडता भोपळाही होईल आवडता, पौष्टिक पोटभर खाऊ
एक बाऊल घ्या, त्यात कडक चपातीला मोडून छोटे - छोटे तुकडे करा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टॉमेटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. आपण त्यात बारीक शेव देखील मिक्स करू शकता. अशा प्रकारे हटके चटपटीत चपाती चाट खाण्यासाठी रेडी. आपण हा स्नॅक्स सॉससोबत देखील खाऊ शकता.