Join us  

चपात्या वातड होतात? पंकज भदौरिया सांगतात १ खास ट्रिक; चपात्या फुगतील-मऊ राहतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 3:24 PM

Chapati Making Tips :चपाती करताना लक्ष ठेवा की मध्ये चपाती पातळ असू नये.

 भारतीय घरांमध्ये चपाती मोठया प्रमाणात खाल्ल्या जातात. चपातीशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे. दुपारच्या जेवणापासून  रात्रीच्या जेवणापर्यंत चपातीचा समावेश केला जातो.  (Chapati Making Tips)जेव्हा चपात्या  मऊ, सॉफ्ट, फुललेल्या होण्यासाठी तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता.   चपातीचं पीठ मळताना काही गोष्टींची काळजी घेतली तर कडक होत नाहीत कायम मऊ राहतात. (How to Make Perfect Gol Chapati)

चपाती फुलण्यासाठी पंकज भदौरिया यांनी काही हॅक्स सांगितले आहेत. शेफ यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी चपाती करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. या व्हिडिओत दाखवलेल्या  पद्धतीनुसार तुम्ही मऊ, फुललेली चपाती बनवू शकता.

चपातीचं पीठ मळण्याची ट्रिक

चपाती सॉफ्ट आणि फुललेली बनावी असं तुम्हाला वाटत असेल तर पीठ मळण्याच्या ट्रिककडे लक्ष द्यायला हवं. शेफ पंकज भदौरीया यांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाण्यात पीठ मळण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोमट पाण्याने पीठ मळल्याने चपात्या मऊ आणि मुलायम राहतात.

पीठ मळण्याची योग्य पद्धत

 शेफ पंकज भदौरिया सांगतात की मऊ चपात्या होण्यासाठी पीठ नरम होईपर्यंत मळायला हवं. यासाठी  पीठ बोटाने दाबून पाहा. जर बोटाने व्यवस्थित दाबले गेले तर आणि बाऊंस बॅक होऊन आले तर समजून जा की चपात्या व्यवस्थित फुलून तयार आहेत.

पीठ थोडावेळ तसंच ठेवा

चपाती करताना कमीत कमी २० ते ३० मिनिटं आधी पीठ मळून घ्या. ज्यामुळे चपात्या मऊ बनतात आणि फुग्यासारख्या फुलतात. पीठ मळल्यानंतर २० ते ३० मिनिट सोडल्यानंतर चपाती पुन्हा हलक्या हाताने पीठ मळून घ्या.

चपात्या कशा शेकाव्यात?

चपाती करताना लक्ष ठेवा की मध्ये चपाती पातळ असू नये. यानंतर हलक्या हाताने आचेवर शेकून घ्या. उच्च आचेवर चपाती शेकल्याने त्या जळू शकतात.  जर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर चपाती करत असाल तर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. चपाती फुलल्यानंतर  शेकण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स