आपण दिवसभरात २ वेळा जेवतो. दुपारचे जेवण आणि डिनरमध्ये पोळ्या हमखास असतात (Healthy Chapati). गव्हाची पोळी शरीराला पौष्टीक घटक प्रदान करतात (Food). आहारात कार्ब्स, जीवनसत्त्वे, फायबर आणि इतर पोषक घटकांचा समावेश करायला हवा. त्यामुळे फक्त गव्हाची पोळी न खाता, आपण त्यात काही पदार्थ मिसळून खाऊ शकता. यामुळे पोळी अधिक पौष्टीक होऊ शकतात.
गव्हाच्या पोळीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते (Cookimg Tips). पण काहींना पोळ्या पचत नाही. ज्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. जर पोळीला हेल्दी बनवायची असेल तर, त्यात ३ पैकी १ पदार्थ मिसळा. आरोग्याला मिळतील फायदे, तब्येतही राहील ठणठणीत(Chapati recipe, How to make soft chapati Recipe; mix 3 ingredients for healthy chapati).
कणिक मळताना त्यात मिसळा ३ पदार्थ
मेथी दाणे
कणिक मळताना आपण त्यात मेथी पावडर किंवा मेथीची पानं मिसळू शकता. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात लोह, फायबर आणि मॅग्नेशियम असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. यासह रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. जर आपण मधुमेहग्रस्त असाल तर, मेथी दाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अस्सल पारंपरिक चव - खा झणझणीत भडंग; १० मिनिटात कुरकुरीत भडंग करण्याची रेसिपी
फ्लॅक्ससीड
अळशीच्या बिया ज्याला फ्लॅक्ससीड असेही म्हणतात. याचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला फायदाच होतो. फ्लॅक्ससीडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, लिग्नॅन्स आणि फायबर आढळते. हे पौष्टीक घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे ब्लोटिंगची समस्या कमी होते आणि हेल्दी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल
शेवग्याच्या पानांची पावडर
कणिक मळताना आपण त्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करू शकता. शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई, कॅल्शियम आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात. यामुळे चपातीचे पोषण वाढते. ज्यामुळे हाडं मजबूत, रोगप्रतिकार शक्ती वाढणे आणि त्वचेवर नवी चमक येते.