Lokmat Sakhi >Food > चपातीला तूप लावून का खावं? तूप लावून चपात्या खाण्याचे फायदे-तोटे वाचून ठरवा काय उत्तम..

चपातीला तूप लावून का खावं? तूप लावून चपात्या खाण्याचे फायदे-तोटे वाचून ठरवा काय उत्तम..

Chapati with Ghee : आरोग्य तज्ज्ञांच्यामते चपातीवर तूप लावल्यास कोणतंही नुकसान  होत नाही पण जास्त प्रमाणात तूप लावणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:24 PM2023-04-28T12:24:53+5:302023-04-28T16:04:07+5:30

Chapati with Ghee : आरोग्य तज्ज्ञांच्यामते चपातीवर तूप लावल्यास कोणतंही नुकसान  होत नाही पण जास्त प्रमाणात तूप लावणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Chapati with Ghee : Chapati with Ghee What are the health benefits of adding ghee to chapati | चपातीला तूप लावून का खावं? तूप लावून चपात्या खाण्याचे फायदे-तोटे वाचून ठरवा काय उत्तम..

चपातीला तूप लावून का खावं? तूप लावून चपात्या खाण्याचे फायदे-तोटे वाचून ठरवा काय उत्तम..

चपातीला तूप लावून खाणं अनेकांना आजही आवडतं. चपातीची चव आणि सुंगधानं पोट भर जेवल्यासारखं वाटतं.  काहीजण चपातीला तूप लावल्याशिवाय अजिबात खात नाहीत. (Chapati with Ghee) तूप लावलेली चपाती कोणत्याही गोड पदार्थासह उत्तम लागते. अगदी  चहाबरोबर लोक तूप लावलेली चपाती आवडीनं खातात. चहा चपाती खाण्याचे फायद्यांसह तोटेही आहेत. (Should you apply ghee on chapati Is it healthy)

चपातीवर तूप लावायला हवं की नाही?

आरोग्य तज्ज्ञांच्यामते चपातीवर तूप लावल्यास कोणतंही नुकसान  होत नाही पण जास्त प्रमाणात तूप लावणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. तर काहीजणांसाठी फायदेशीर ठरतं. म्हणूनच चपातीला तूप लावून कोणी खावं आणि कोणी तूप न लावलेली चपाती खावी हे समजून घेणं महत्वाचं आहे.

प्रत्येक मानवी शरीराची स्वतःची क्षमता असते. तूप कोणाला फायदेशीर आणि कोणाला हानी पोहोचवते, त्या व्यक्तीचे आरोग्य जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर एखाद्याचे आरोग्य आधीच कमजोर असेल तर त्याला तुपाचा फायदा मिळत नाही. याउलट तूप कमी प्रमाणात खाल्ल्यास कोणतेही नुकसान होत नाही. चपात्यांवर थोडेसे तूप लावले तर नुकसान होत नाही.

 वजन कमी करण्यासाठी तूप खायचं की नाही?

तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्यासाठीही तूप फायदेशीर आहे. अशा काही समजुती आहेत ज्यात असे मानले जाते की वजन कमी करण्यासाठी तूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी लवकर तुपासह भाकरी खाल्ल्यास दिवसभर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. कारण चपातीवर तूप लावल्यानंतर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि निरोगी कोलेस्ट्रॉलही वाढू शकते.

जास्त तूप लावल्यास काय होतं?

जास्त प्रमाणात तूप खाणे हानिकारक ठरू शकते. तुपाच्या सेवनाने हृदयाच्या आरोग्याचे नुकसान होते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. तूप जास्त काळ जास्त तापमानात ठेवल्याने त्याची रचना बदलते आणि शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ लागतात. फ्री रॅडिकल्सची निर्मिती म्हणजे अनेक रोगांचे दार. म्हणूनच एक किंवा दोन चमच्यांपेक्षा जास्त तूप कधीही खाऊ नये.

Web Title: Chapati with Ghee : Chapati with Ghee What are the health benefits of adding ghee to chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.