उन्हाळ्यात सिझनल फळांची खूप मागणी वाढते. ही फळे खाण्यासाठी चवीला तर असतातच यासह आरोग्याला देखील पोषण देतात. आंबे, फणस, काजू, कलिंगड, यासह करवंद देखील मोठ्या प्रमाणावर मिळतात. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं सेवन निश्चित करायला हवं. याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
करवंदाला ‘डोंगरची काळी मैना’ देखील म्हणतात. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. करवंद खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. करवंद असच खाण्यापेक्षा त्याची चटणी बनवून खा. करवंदाची चटणी चवीला चटकदार लागते. आंबट - गोड - तिखट चवीच्या या पौष्टीक करवंदाची चटणी करण्याची सोपी कृती पाहूयात(Chatakdar Karvandachi Chutney, fingerlicking Maharashtrian recipe).
करवंदाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
करवंद
लसणाच्या पाकळ्या
हिरव्या मिरच्या
किसलेलं ओलं खोबरं
तिळाची परफेक्ट चटणी करण्याची रेसिपी, कमी वेळात-कमी साहित्यात करा चटकदार चटणी
जिरं
मीठ
या पद्धतीने बनवा करवंदाची चमचमीत चटणी
सर्वप्रथम, कच्च्या करवंदाची देठ काढून घ्या, व करवंद एका बाऊलमध्ये ठेवा. त्यात पाणी घालून करवंदे चांगली धुवून घ्या. करवंदे धुतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला, त्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, किसलेलं ओलं खोबरं, जिरं, चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या.
साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी
मिश्रण वाटत असताना त्यात पाणी घालू नये, व ही चटणी बारीक पेस्ट वाटून घ्या, अशा प्रकारे करवंदाची चटकदार चटणी खाण्यासाठी रेडी., आपण या चटणीवर फोडणी देऊ शकता. ही चटणी चपाती किंवा भाकरीसह खायला चविष्ट लागते.