Lokmat Sakhi >Food > मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी

मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी

Chatpata Masala Corn Recipe In Marathi: मसाला कॉर्न करण्याची एकदम सोपी आणि अतिशय चवदार रेसिपी एकदा नक्की बघा...(how to make masala corn at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 09:06 AM2024-07-31T09:06:42+5:302024-07-31T16:14:40+5:30

Chatpata Masala Corn Recipe In Marathi: मसाला कॉर्न करण्याची एकदम सोपी आणि अतिशय चवदार रेसिपी एकदा नक्की बघा...(how to make masala corn at home?)

chatpata masala corn recipe, how to make masala corn at home, healthy recipe of sweet corn | मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी

मॉल- मल्टीप्लेक्समध्ये मिळतात तसे चटपटीत- गरमागरम ‘मसाला कॉर्न’ घरी करायचेत? घ्या सोपी रेसिपी

Highlightsअतिशय सोप्या पद्धतीने चित्रपटगृहात मिळतात तसे अगदी त्याच चवीचे मसाला कॉर्न कसे करायचे ते पाहा.

टॉकीज किंवा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेल्यानंतर असे मोजके दोन- तीन पदार्थ असतात जे आपण आवर्जून घेतोच. ते पदार्थ म्हणजे पॉपकॉर्न, चिप्स आणि चटपटीत गरमागरम असे मसाला कॉर्न. या दिवसांत बाजारात भरपूर स्वीटकाॅर्न असतात. त्यामुळे त्यांचा आस्वाद तर नक्कीच घेतला पाहिजे. स्वीटकॉर्न जसे चवीला उत्तम असतात तसेच आरोग्यासाठीही अतिशय पोषक असतात (healthy recipe of sweet corn). आता बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की काही केल्या घरच्या स्वीटकॉर्नला ती खास चव येतच नाही (how to make masala corn at home?). तुमचंही असंच म्हणणं असेल तर घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने चित्रपटगृहात मिळतात तसे अगदी त्याच चवीचे मसाला कॉर्न कसे करायचे ते पाहा. (chatpata masala corn recipe in marathi)

 

चटपटीत मसाला कॉर्न रेसिपी  

चटपटीत मसाला कॉर्न कसे करायचे याची रेसिपी smitadeoofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय

१ टेबलस्पून तूप

२०० ग्रॅम बॉईल्ड कॉर्न

पाव टीस्पून लाल तिखट

चवीनुसार थोडंसं मीठ

अर्धा टीस्पून चाट मसाला 

बारीक चिरलेली कोथिंबीर १ चमचा

अर्ध्या लिंबाचा रस

 

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तूप टाका.

तूप वितळलं की त्यामध्ये उकडून घेतलेले कॉर्न टाका आणि व्यवस्थित हलवून घ्या.

ते दोघे भांडत आणि मी पायऱ्यांवर..! रणवीर कपूर सांगतो अजूनही कुणी आरडाओरडा केला तर मला...

यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, चाटमसाला, कोथिंबीर असं सगळं टाका आणि पुन्हा एकदा सगळे पदार्थ दिड ते दोन मिनिटांसाठी व्यवस्थित हलवून घ्या. 

यानंतर गॅस बंद करा आणि मग कॉर्नवर लिंबू पिळा. पुन्हा एकदा सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घेतले की अगदी टॉकीजमध्ये मिळतात तसे चटपटीत मसाला कॉर्न झाले तयार. 



 

Web Title: chatpata masala corn recipe, how to make masala corn at home, healthy recipe of sweet corn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.