Join us  

विकतचे बॉबी किंवा कुरकुरे कशाला? आता करा तांदळाच्या पिठाची बॉबी, वर्षभर टिकेल-जंक फूडचा त्रास नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 4:06 PM

Chawal Aata Ke Fryums | Rice Flour Chips तांदुळाच्या पिठाची बॉबी घरच्याघरीही सहज करता येते, बॉबी आवडत असेल तर जंक फूड खाण्याची चिंता न करता खा

उन्हाळ्यात महिलावर्गाची पापड, कुरडई, फ्रायम्स, लोणचं, बनवण्याची लगबग सुरु होते. हे पदार्थ एका दिवसात तयार होतात. पण साठवून ठेवल्यानंतर वर्षभर टिकतात. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हे पदार्थ उत्कृष्ट लागतात. कुरकुरीत, खमंग चवीचे हे पदार्थ खाताना, गावाकडच्या आठवणी ताज्या होतात.

आपण गावाकडे असताना तांदळाची कुरकुरीत बॉबी खाल्लीच असेल. ज्याला आपण फ्रायम्स म्हणूनही ओळखतो. ही रेसिपी कमी साहित्यात, कमी मेहनत घेता, कमी वेळात झटपट बनते. ही रेसिपी साठवून ठेवल्यास वर्षभर टिकतात. मुख्य म्हणजे याला तळल्यानंतर चौपटीने फुलतात. ज्यामुळे चवीला ते आणखी कुरकुरीत लागतात. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(Chawal Aata Ke Fryums | Rice Flour Chips).

तांदळाची बॉबी करण्यासाठी लागणारं साहित्य

एक कप तांदळाचं पीठ

जिरं

मीठ

पापड खार

पाणी

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

अशा पद्धतीने बनवा कुरकुरीत तांदळाच्या पीठाचे बॉबी

सर्वप्रथम, एका कढईत २ कप पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार घालून साहित्य पाण्यात मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप तांदळाचे पीठ घालून मिश्रण मिक्स करा. पिठाच्या गुठळ्या तयार होणार नाही, याची काळजी घ्या. चमच्याच्या मदतीने मिश्रण चांगले मिक्स करा. 

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेऊन गॅस लो प्लेमवर ठेवा. ५ मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून पुन्हा मिश्रण मिक्स करा. आता गॅस बंद करून घ्या, व हे तयार पीठ एका परातीत काढून घ्या. त्यानंतर थंड पाण्याच्या हातानेच पीठ चांगले मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर चकलीच्या साच्यात पीठ भरा, व प्लास्टिकच्या पेपरवर बॉबी बनवून घ्या.

साऊथ इंडियन कारा चटणीची झटपट कृती, इडली-डोशासोबत खाण्यासाठी चटकदार चटणी

बॉबी तयार झाल्यानंतर उन्हात २ दिवसांसाठी वाळवण्यासाठी ठेवा. अशा प्रकारे तांदळाच्या पिठाच्या बॉबी रेडी झाले आहेत. आता हे बॉबी आपण गरम तेलात तळून खाऊ शकता. तळल्यानंतर बॉबी चौपटीने फुलतात. हवाबंद डब्यात आपण या बॉबी वर्षभरासाठी साठवून ठेऊ शकता. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल