Join us  

न थापता करा तांदळाची पातळ पौष्टिक भाकरी, १ ट्रिक- शिळी भाकरीही राहील मऊसुत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 1:12 PM

Chawal Bhakri recipe, Maharashtrian Tandalachi Bhakri : तांदुळाची भाकरी करायला प्रत्येकाला जमेलच असे नाही, पण या एका ट्रिकमुळे न चुकता भाकऱ्या जमतील..

भारतीय घरांमध्ये भाकरी आणि चपाती आवडीने खाल्ली जाते. भाजी असो किंवा डाळ त्याच्यासोबत आपण भाकरी खातोच. भाकरी अनेक धान्यांच्या पिठाची केली जाते. पण भाकऱ्या गोल टम्म फुगीर होतीलच असे नाही. बऱ्याचदा पीठ नीट मळले जाते नाही, किंवा भाकऱ्या थापताना तुटतात, शेकल्यानंतर कडक होतात. तांदुळाची भाकरी आपण खाल्लीच असेल. तांदुळाची भाकरी करण्यासाठी उकड तयार करण्यात येते (Cooking Tips).

पण कधी उकड व्यवस्थित तयार होत नाही. किंवा भाकरी नीट थापायला जमत नाही (Tandalachi Bhakri). तांदुळाची भाकरी थापताना व्यवस्थित तयार होत नसेल, वारंवार तुटत असेल तर, एक ट्रिक वापरून पाहा. एका ट्रिकच्या मदतीने तांदुळाच्या भाकऱ्या परफेक्ट तयार होतील(Chawal Bhakri recipe, Maharashtrian Tandalachi Bhakri).

न थापता तांदुळाची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदुळाचं पीठ

आलं-लसूण पेस्ट

बारीक चिरलेली कोथिंबीर

घावन करायला जावं तर ते तव्याला चिकटतं? उलटताना तुटतं? पाहा पारंपरिक कोकणी घावन रेसिपी

चिली फ्लेक्स

तेल

पाणी

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका कढईत दीड कप पाणी घाला. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, एका चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक कप तांदुळाचं पीठ घालून चमच्याने मिक्स करा. उकड तयार झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर हाताने पीठ मळून घ्या.

घरातला लसूण संपला? ऐनवेळी लसणाऐवजी वापरा ३ गोष्टी, पदार्थ होईल रुचकर

जर आपल्याला भाकऱ्या थापायला जमत नसेल तर, लाटणं आणि पोळपाट्याची मदत घ्या. पोळपाट्यावर थोडे पीठ शिंपडा. त्यावर पिठाचा एक गोळा ठेवा, व लाटण्याने भाकरी लाटून घ्या. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा तापल्यानंतर हलक्या हाताने भाकरी उचलून तव्यावर टाका, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. भाकरी शेकताना त्यावर तेल लावा. जेणेकरून भाकऱ्या मऊ-लुसलुशीत तयार होतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स