Lokmat Sakhi >Food > थंडीत स्वस्त मिळतात, खूप आवडतात म्हणून खाल्ले भरपूर मटार! -अति खाऊ नका पस्तावाल कारण..

थंडीत स्वस्त मिळतात, खूप आवडतात म्हणून खाल्ले भरपूर मटार! -अति खाऊ नका पस्तावाल कारण..

गोड-कोवळे मटार खातच राहावेसे वाटतात, पण तोंडावर ताबा ठेवा, नाहीतर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:21 PM2021-12-06T17:21:19+5:302021-12-06T17:24:52+5:30

गोड-कोवळे मटार खातच राहावेसे वाटतात, पण तोंडावर ताबा ठेवा, नाहीतर....

Cheaper in the cold, much loved so ate plenty of peas! -Don't overeat because .. | थंडीत स्वस्त मिळतात, खूप आवडतात म्हणून खाल्ले भरपूर मटार! -अति खाऊ नका पस्तावाल कारण..

थंडीत स्वस्त मिळतात, खूप आवडतात म्हणून खाल्ले भरपूर मटार! -अति खाऊ नका पस्तावाल कारण..

Highlightsमटार खा, पण बेतानेच, जास्त खाल्लेले आरोग्यासाठी घातकथंडीत बाजारात येणारे हिरवे गार मटार दिसल की महिलांना कोणकोणते पदार्थ करावेत असे होते, पण त्याआधी हे वाचाच

थंडीच्या सिझनमध्ये बाजारात भाज्या आणि फळं एकदम स्वस्त आणि मस्त मिळतात. त्यातही मटार, गाजर या याच सिझनमध्ये मिळणाऱ्या भाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. मटार कोणाला नाही आवडत? गोड, कोवळे मटारचे दाणे कितीही तोंडात टाकले तरी मन भरत नाही. निम्मे मटार तर सोलतानाच संपून जातात. याबरोबरच थंडीत गरमागरम मटार उसळ, पावभाजी, मटार करंजी असे एकाहून एक पदार्थांचे बेत रंगतात. गोड कोवळे मटार खायला मस्त लागत असतील तरी ते प्रमाणात खायला हवेत. मटारमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच मटारमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंटस, व्हीटॅमिन ए, ई, डी, सी हे आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात. असे असले तरी ते अति प्रमाणात खाल्ले तर आरोग्यावर त्याचे विपरित परीणाम होऊ शकतात. पाहूयात मटार खाण्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत...

(Image : Google)
(Image : Google)

१. व्हीटॅमिन के च्या पातळीत वाढ - व्हीटॅमिन के शरीरातील कॅन्सरच्या पेशींना रोखण्यासाठी फायदेशीर असते. तसेच या व्हीटॅमिनमुळे हाडांना मजबूती येण्यास मदत होते. मात्र मटारमध्ये या व्हीटॅमिनची मात्रा जास्त असल्याने शरीरातील या घटकाचे प्रमाण वाढते आणि रक्त प्रमाणापेक्षा जास्त पातळ करण्यास हा घटक कारणीभूत ठरतो. तसेच के व्हीटॅमिनमुळे शरीरातील प्लेटलेटसची संख्या कमी होते. त्यामुळे जखम भरण्यास जास्त वेळ लागतो. ज्यांना पोटाशी संबंधित तक्रारी आहेत अशांनी मटार जास्त प्रमाणात खाऊ नयेत. 

२. शरीराचे पोषण होण्यात अडथळा - मटारमुळे शरीरातील फायटीक अॅसिड आणि लॅक्टीन हे पोषक घटक शोषण्यास अडथळा येतो. मटारमुळे शरीरातील खनिजे, झिंक, मॅग्नेशियम हे घटक कमी होण्यास सुरुवात होते, त्यामुळे शरीराला पोषक घटकांची कमतरता भासू शकते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि व्यक्ती सतत आजारी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मटार प्रमाणात खाल्लेले केव्हाही चांगले. 

३. वजन वाढण्यास कारणीभूत - मटारमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असले तरी जास्त प्रमाणात मटार खाल्ल्याने फॅटस वाढण्यास कारणीभूत होतात. त्यामुळे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढते. सामोसा, पावभाजी किंवा इतरही अनेक पदार्थांमध्ये मटार सर्रास असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शक्यतो जंक फूड खाणे टाळायला हवे.

(Image : Google)
(Image : Google)

४. पोटात सूज येऊन गॅसेसचा त्रास - मटार आरोग्यासाठी वातूळ असतो असे म्हणतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मटार खाल्ल्यास पोटात सूड येण्याची शक्यता असते. तसेच वातूळ पदार्थांमुळे ज्याप्रमाणे गॅसेसचा त्रास होतो, त्याचप्रमाणे मटारचे अधिक सेवन केल्यास गॅसेसचा त्रास होतो. यामुळे कधीकधी पोटदुखी, अस्वस्थता अशा तक्रारी उद्भवतात. 

५. गाठी होण्यास कारण - मटारमध्ये प्रोटीन, अमिनो अॅसिड आणि फायबर यांचे प्रमाण खूप जास्त असते. यामध्ये व्हीटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असते. हाडांची घनता वाढण्यास उपयुक्त असते. पण खूप जास्त प्रमाणात मटार खाल्ल्यास शरीरात गाठी तयार होऊ शकतात. युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी होते आणि हाडे कमजोर होण्यास मटार कारणीभूत ठरु शकतात. 
 

Web Title: Cheaper in the cold, much loved so ate plenty of peas! -Don't overeat because ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.