Join us  

कांदवणी हा पारंपरिक पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? ५ मिनिटांत करा चमचमीत भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2024 12:25 PM

Check out Classic Maharashtrian Style kandyachi bhaji, easy recipe : मुलं भाज्या खाताना नाकं मुरडत असतील तर, एकदा त्यांना कांद्याची भाजी देऊन पाहा..

अनेकांच्या रोजच्या आहारात चपाती भाजी असतेच. चपाती-भाजी खाल्ल्याने पोट तर भरतेच, शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. चपातीसोबत आपण पालेभाज्या किंवा फ्लॉवर-वाटाणा, बटाटा, भेंडी किंवा इतर भाज्या खातोच. भाज्या खाल्ल्याने शरीराला पौष्टीक घटक मिळतात. पण अनेकदा भाज्या खाण्याचा देखील कंटाळा येतो.

त्याच-त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन जिभेला नवीन चव मिळत नाही. जर आपल्याला भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा, भाज्यांव्यातिरिक्त नवीन काहीतरी चमचमीत खायचं असेल तर, कांदवणी (Kandyachi Bhaji) ही रेसिपी ट्राय करून पाहा (Cooking Tips). प्रत्येकाच्या घरात कांदे असतात. कांदवणी या रेसिपीला काही ठिकाणी कांद्याची भाजी देखील म्हणतात. ही भाजी चवीला चटकदार लागते, शिवाय ५ मिनिटात तयार होते (Check out Classic Maharashtrian Style kandyachi bhaji, easy recipe).

कांदवणी करण्यासाठी लागणारं साहित्य

२ कांदे

टॉमेटो

शेंगदाण्याचं कूट

कोथिंबीर

ठेचलेला लसूण

जिरं

हळद

ना गॅसचा वापर-ना जास्त वाटण घाटण, मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी घालून करा चमचमीत चटणी

लाल तिखट

काळा मसाला

मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्या. कांद्याचा रंग लालसर झाल्यानंतर त्यात ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला टॉमेटो घालून साहित्य एकत्र परतवून घ्या.

हिरवी-लाल की पिवळी? कोणती ढोबळी मिरची तब्येतीसाठी ठरते वरदान, वाचा रंगात दडलेलं सिक्रेट

नंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करा. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून, कढईवर झाकण ठेवा. २ मिनिटांसाठी वाफेवर कांदे शिजवून घ्या. २ मिनिटानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर भुरभुरून चमच्याने साहित्य एकजीव करा. अशा प्रकारे कांदवणी म्हणजेच कांद्याची भाजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भाजी चपाती, भाजी किंवा भाकरीसह देखील खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स