हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या प्रचंड प्रमाणात मिळतात. मेथी, कांदा पात, शेपू यासह हरबऱ्याच्या कोवळ्या पानांची देखील भाजी केली जाते. काहींना हरबऱ्याच्या पानांची भाजी आवडते. तर, काही जण ही भाजी नाकं मुरडत खातात. पण हरबऱ्याच्या पानांची भाजी (Tender Chickpeas Leaves) खाण्याचे अनेक फायदे आहेत. हरबऱ्याचा ताजा पाला आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरतो.
गावाकडे ही भाजी मोठ्या प्रमाणात मिळते, शिवाय चवीनेही खाल्लीही जाते. पण शहरी भागात ही भाजी कमी प्रमाणात मिळते. हिवाळ्यात प्रत्येक भागात हरबऱ्याच्या कोवळ्या पानांची जुडी किंवा वाटा मिळतो. जर आपल्याला गावरान पद्धतीने ही भाजी कशी तयार करायची हे ठाऊक नसेल तर, एकदा ही रेसिपी पाहा (Cooking Tips). कमी वेळात, कमी साहित्यात ही चविष्ट भाजी तयार होते(Check out Harbhayachhya pananchi bhaaji, tender chickpeas leaves bhaji good for health).
हरबऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य
हरबऱ्याची कोवळी पानं
लसूण
हिरवी मिरची
न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त
मोहरी
जिरं
मूग डाळ
मीठ
तेल
पाणी
कृती
सर्वप्रथम, खलबत्त्यात ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या घालून ठेचून घ्या. तयार मिरचीचा ठेचा एका वाटीत काढून घ्या. दुसरीकडे लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात २ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची-लसणाचा ठेचा घालून तेलात परतवून घ्या.
झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...
दुसरीकडे कोवळ्या हरबऱ्याची पानं निवडून धुवून घ्या. नंतर फोडणीत हरबऱ्याची पानं आणि ३ टेबलस्पून मूग डाळ घालून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून मध्यम आचेवर भाजी शिजवून घ्या. अशा प्रकारे पौष्टीक गावरान पद्धतीची हरबऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भाजी भाकरी किंवा चपातीसह देखील खाऊ शकता.