Lokmat Sakhi >Food > एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

Check out Palak Pakora unique recipe, Crispy recipe made in 10 minutes : पालक चिरून नाहीतर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत कमी तेल पिणारी चविष्ट भजी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 12:23 PM2024-01-14T12:23:52+5:302024-01-14T12:24:46+5:30

Check out Palak Pakora unique recipe, Crispy recipe made in 10 minutes : पालक चिरून नाहीतर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत कमी तेल पिणारी चविष्ट भजी..

Check out Palak Pakora unique recipe, Crispy recipe made in 10 minutes | एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी

हिवाळ्यात पालेभाज्या (Green Vegetables) जास्त प्रमाणात मिळतात. शिवाय ते बाराही महिने खायलाच हव्या. पाले भाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. मेथी, शेपू, कांदा पात, पालक खाल्ल्याने इतर गंभीर आजारांपासून सुटका मिळते. हिवाळ्यात पालकाचे (Palak) पदार्थ आवर्जुन आणि चवीने खाल्ले जातात. पालकामध्ये मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम हे घटक आढळतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

पालकाची भाजी, पराठे, भजी देखील आपण खाल्लीच असेल. भजी करताना आपण पालक चिरून घेतो. पण यंदा पालक चिरून नसून, अख्ख्या पानांचा वापर करून कुरकुरीत भजी तयार करा (Cooking Tips). पालक न खाणारेही पालकाच्या पानांची भजी आवडीने खातील(Check out Palak Pakora unique recipe, Crispy recipe made in 10 minutes).

पालकाच्या अख्ख्या पानांची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य(Palak Bhaji Recipe)

बेसन

मीठ

हळद

लाल तिखट

न खाई भोगी..तो सदा रोगी, भोगीची भाजी करण्याची पाहा अस्सल पारंपरिक रेसिपी, आजीची हातची चव

धणे पूड

पाणी

पालक

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे पूड, आणि गरजेनुसार पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा. ज्याप्रमाणे आपण भज्यांसाठी बॅटर तयार करतो तसे करा. जास्त जाडसर बॅटर तयार केल्यास भजी मऊ तयार होतील. आता पालकाची जुडी साफ करून प्रत्येक पानं वेगळे करून धुवून घ्या. कोरड्या कापडाने पालकाची पानं स्वच्छ पुसून घ्या.

संक्रातीला केलेले तिळाचे लाडू महिनाभर टिकतील, घ्या कपभर तिळाची सोपी रेसिपी-कडकही होणार नाहीत

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. बॅटरमध्ये पालक बुडवून हलक्या हाताने तेलात सोडा, व दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशाप्रकारे पालकाची हॉटेलस्टाईल कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Check out Palak Pakora unique recipe, Crispy recipe made in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.