Join us

इडली आणि गन पावडर, असा पदार्थ खाल्ला आहे कधी? पाहा साऊथ इंडियन पोडीची मस्त सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 19:36 IST

Check out this delicious and easy recipe for South Indian Podi : तेल किंवा तूप घालून खा ही मस्त चटणी. चवीला एकदम भन्नाट अशी गन पावडर.

साऊथ इंडियन खाद्य पदार्थ चवीला अगदी मस्त असतात. इडली, सांबार, चटणी,  डोसा, डालवडा अनेक साऊथचे पदार्थ आपण नाश्त्याला खातो. सध्या पोडी इडली फार लोकप्रिय आहे. ( Check out this delicious and easy recipe for South Indian Podi)पोडी म्हणजे चटणी. ही डाळींची चटणी फारच मस्त लागते. एकदा केली की टिकतेही बरेच महिने. या पोडीला गन पावडर असेही म्हणतात. चवीला जरा झणझणीत असते म्हणून गन पावडर असे नाव पडले. घरी करायला अगदी सोपी अशी ही चटणी भातावरही मस्त लागते. ( Check out this delicious and easy recipe for South Indian Podi)पाहा कशी कराल.    

साहित्य चणा डाळ, उडदाची डाळ, काश्मीरी लाल मिरची, तेल, सुकी लाल मिरची, पांढरे तीळ, शेंगदाणे, कडीपत्ता, लसूण, ताजा नारळ, हिंग, मीठ

कृती१. एक वाटी चणा डाळ घेत असाल तर उडदाची डाळही एक वाटीच घ्या. डाळ समान प्रमाणात वापरा. एक वाटी चणा डाळ एका कढईमध्ये परता. त्यामध्ये तेल पाणी काही घालू नका. सुकेच परतून घ्या. चणा डाळ घातल्यावर त्यामध्ये उडदाची डाळही घाला. किमान दहा मिनिटे तरी डाळी परतून घ्या. एकदम कडक होतील. रंग गडद होईल. 

२. डाळी परतून झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटलीमध्ये गार होण्यासाठी ठेवा. कढईमध्ये चमचाभर तेलावर काश्मीरी लाल मिरची परतून घ्या. त्यामध्ये सुकी मिरचीही घाला. तिखट तुमच्या आवडीनुसार वापरा. जास्त मिरची वापरायची का कमी ते प्रमाण तुम्ही ठरवा. कुरकुरीत झाल्यावर मिरच्या गार व्हायला ठेवा.

३. त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्या. मस्त परता. त्यामध्ये अर्धी वाटी पांढरे तीळ घाला. किमान पाच मिनिटे तरी परता. नंतर गार करत ठेवा. ताजा नारळ परतून घ्या. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घाला. तसेच कडीपत्ता घाला. नारळ सुकून रंग बदलेपर्यंत परता. नंतर गार करत ठेवा.

४. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे परतलेले पदार्थ मिक्स करा. त्यामध्ये चमचाभर हिंग घाला. चवीपुरते मीठ घाला. व्यवस्थित वाटून घ्या. छान सरसरीत चटणी वाटून घ्या. चटणी छान सुकी होते. नंतर एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा.  

टॅग्स :अन्नपाककृतीआहार योजना