Join us

हॉटेलात मिळणारा महागडा पदार्थ घरी करता येतो फक्त १५ मिनिटांत! पाहा ओनियन रिंग्जची चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2025 08:35 IST

Check out this delicious onion rings recipe : कांद्याची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. पाहा काय कराल.

कांदा भजी तसेच बटाटा भजी आपण खातोच. विविध तळणीचे कुरकुरीत पदार्थ अगदी आवडीने खातो. ( Check out this delicious onion rings recipe)पण कधी ओनियन रिंग्ज हा प्रकार खाल्ला आहे का? चवीला अप्रतिम लागतात. हा पदार्थ खास महागड्या हॉटेलमध्ये मिळतो. किंमत तर विचारूच नका. भरपूर महाग असा हा पदार्थ आहे. मात्र घरी तयार करायला अगदीच सोपा आणि स्वतः आहे. ( Check out this delicious onion rings recipe)लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. पाहा कसा कराल.

साहित्यकांदा, मैदा, मीठ, लाल तिखट, कॉर्न फ्लावर, काळी मिरी, पाणी, ब्रेड क्रम्स, तेल

कृती१. कांद्याची सालं काढून घ्यायची. ( Check out this delicious onion rings recipe)कांदा चिरायचा नाही कांदा आडवा करून त्याच्या गोल चकत्या पाडून घ्यायच्या आकाराला जरा जाड ठेवायच्या. बारीक करायच्या नाहीत. पातळ चिरू नका. गोलाकार रींग तयार करून घ्या. 

२. एका पातेल्यामध्ये मैदा घ्या. दोन वाटी मैदा वापरत असाल तर अर्धी वाटी कॉर्न फ्लावर वापरा. त्यामध्ये काळीमिरी पूड घाला. लाल तिखट घाला. चवीपुरते मीठ घाला. सगळं मिक्स करा. मग पाणी घाला आणि भजीसाठी जसे पीठ तयार करता तसेच पीठ तयार करून घ्या. 

३. चमचाभर तेल गरम करा आणि त्या पीठामध्ये टाका. छान मिक्स करून घ्या. अति पातळ करू नका. कांदा व्यवस्थित बुडेल एवढेच पाणी वापरा.

४. बाजारात रेडीमेड ब्रेड क्रम्स मिळतात. घरी तयार करणेही अगदीच सोपे आहे. ब्रेडच्या कडा काढून घ्या. नंतर ब्रेड मिक्सरमधून फिरवा आणि त्याचा भुगा तयार करून घ्या. जास्त वेळ फिरवू नका नाही तर लगदा होईल. एखादी पोळी ब्रेड बरोबर मिक्सरमध्ये फिरवली तर आणखी कुरकुरीत होईल. 

५. कढईमध्ये तेल तापत ठेवा. तेल व्यवस्थित तापल्यावर कांद्याच्या गोल चकत्या पीठात बुडवा मग त्याला ब्रेड क्रम्स लावा आणि मग ते तळून घ्या. मस्त गडद पिवळा रंग येईस्तोवर तळून घ्या. नंतर आवडत्या चटणी किंवा सॉसबरोबर खा.   

टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्सकांदा