Join us

चांगल्या क्वालिटीचा गूळ विकत घेण्यासाठी पंकज भदौरिया सांगतात ३ टिप्स, निवडा योग्य गूळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 18:52 IST

How to buy perfect Jaggery : Check this 3 things before you go out to buy Jaggery : How to identify good quality jaggery : 3 ​Easy tips to check the purity of jaggery : How do you know a Good Quality Jaggery : गूळ विकत घेताना कोणत्या तीन गोष्टी तपासून पाहाव्यात, त्या कोणत्या ते पाहा...

हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर असतो. काही पदार्थ असे असतात की जे थंडीच्या दिवसांत खाल्ल्याने शरीराला थंडीपासून बचाव (How to buy perfect Jaggery) करण्यासाठी फायदा होतो. हिवाळयात शरीराला उष्णता मिळवून देण्याऱ्या अनेक पदार्थांपैकी गूळ हा एक अतिशय महत्वाचा पदार्थ. एरवी वर्षाचे बाराही महिने गूळ खाणे (Check this 3 things before you go out to buy Jaggery) आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. परंत्तू हिवाळ्यात गूळ (How to identify good quality jaggery) खाल्ल्याने त्याचे दुप्पट फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. यासाठीच हिवाळ्यात गुळापासून तयार केलेले अनेक पदार्थ फार मोठ्या प्रमाणांत खाल्ले जातात(3 ​Easy tips to check the purity of jaggery).

थंडीच्या दिवसांत घरोघरी असे गुळाचे पदार्थ तयार करण्यासाठी गूळ मोठ्या प्रमाणांत विकत आणला जातो. परंतु आपण विकत आणलेला गूळ ताजा आणि चांगल्या दर्जाचा (How do you know a Good Quality Jaggery) आहे की नाही हे आपल्याला फारसे माहित नसते. अशावेळी आपण विकत घेत असलेल्या गुळाचा दर्जा तपासून पाहण्यासाठी मास्टरशेफ पंकज भदौरिया (MasterChef Pankaj Bhadouria) तीन महत्वाच्या टिप्स सांगत आहेत. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून गूळ विकत घेताना कोणत्या तीन गोष्टी तपासून पाहाव्यात याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.   

गूळ विकत घेताना कोणत्या तीन गोष्टी तपासून पाहाव्यात... 

१. रंग :- गूळ विकत घेताना तो ताजा आणि चांगल्या दर्जाचा असावा यासाठी गुळाचा रंग सर्वात आधी तपासून पाहावा. गूळ फिकट पिवळ्या रंगाचा किंवा पांढरा असेल तर विकत घेणं टाळा. गूळ नेहमी गडद आणि थोडासा काळपट रंगाचा असेल असाच विकत घ्यावा. जर गुळाचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा असेल तर त्यात भरपूर प्रमाणांत केमिकल्स असतात म्हणून असा गूळ घेऊ नका. गडद किंवा थोडासा काळपट रंगाचा गूळ हा उसाचा रस शिजवून त्यापासून तयार केला जातो त्यामुळे याचा रंग गडद असतो म्हणून नेहमी थोडा गडद आणि काळपट रंगांचाच गूळ घ्यावा. 

पारंपरिक हुरडा थालीपीठ आवडतं, ‘असं’ हुरडा धिरडंही करुन पाहा, पोटभर-पौष्टिक खाण्याचं सुख...

२. चव :- गूळ विकत घेण्याआधी तो थोडासा चाखून पाहावा. गूळ खाल्ल्यानंतर जर तो चवीला हलकासा खारट लागत असेल तर विकत घेऊ नका. गूळ बरेच दिवस स्टोअर करून ठेवल्यास त्यातील मिनरल्समुळे तो हळूहळू खारट होऊ लागतो. यासाठीच, गूळ खाल्ल्यानंतर जर तो चवीला गोड लागत असेल तर नेहमी असाच गूळ खरेदी करावा. चवीला खारट असणारा गूळ विकत घेणं टाळाव. 

पीठ एक पदार्थ अनेक, इडली-डोसे-उत्तपे-आप्पे करा काहीही, पाहा मल्टिपर्पज पिठाची रेसिपी...

३. गुळाचा कडकपणा :- जर गूळ अगदी सहजपणे हाताने दाब दिल्यावर तुटत असेल तर असा गूळ विकत घेऊ नका. जर गूळ हाताला भुसभुशीत, मऊ, नरम लागत असेल तर असा गूळ विकत घेऊ नका. याउलट, हाताने सहज न तुटणारा आणि हाताला कडक आणि तोडायला कठीण असणारा असाच गूळ विकत घ्यावा. केमिकल्स मिक्स न करता फक्त उसाच्या रसापासून तयार केलेल्या गुळाला एक विशिष्ट प्रकारचा कडकपणा असतो. गूळ विकत घेताना गुळाचा कडकपणा तपासून पाहावा.

आता भाजणीशिवाय करा खमंग-खुसखुशीत थालीपीठ! सकाळी नाश्ता भारी तर दिवस लै भारी...

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.