Lokmat Sakhi >Food > Cheese Burst Sandwich: ना भाज्या, ना सलाड, ना अवघड सारण, ५ मिनिटांत करा चीज बर्स्ट सॅण्डविज; बघा रेसिपी

Cheese Burst Sandwich: ना भाज्या, ना सलाड, ना अवघड सारण, ५ मिनिटांत करा चीज बर्स्ट सॅण्डविज; बघा रेसिपी

Food And Recipe: मस्त पावसाळी थंड वातावरण झालं की असं काहीतरी गरमागरम यम्मी खावं वाटतंच ना... मग करून बघा ही रेसिपी, मुलांसकट घरातले सगळेच होऊन जातील खुश. (Cheese burst sandwich recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 04:40 PM2022-06-22T16:40:33+5:302022-06-22T16:41:09+5:30

Food And Recipe: मस्त पावसाळी थंड वातावरण झालं की असं काहीतरी गरमागरम यम्मी खावं वाटतंच ना... मग करून बघा ही रेसिपी, मुलांसकट घरातले सगळेच होऊन जातील खुश. (Cheese burst sandwich recipe)

Cheese burst sandwich recipe, How to make sandwich? Simple, easy method of making yummy sandwich | Cheese Burst Sandwich: ना भाज्या, ना सलाड, ना अवघड सारण, ५ मिनिटांत करा चीज बर्स्ट सॅण्डविज; बघा रेसिपी

Cheese Burst Sandwich: ना भाज्या, ना सलाड, ना अवघड सारण, ५ मिनिटांत करा चीज बर्स्ट सॅण्डविज; बघा रेसिपी

Highlightsया सॅण्डविजचं वैशिष्ट्य म्हणजे ते झटपट तर होतंच पण करायलाही अतिशय सोपं आहे.

सॅण्डविज हा लहानांसकट मोठ्या मंडळींचाही आवडीचा पदार्थ. खूप घाई असेल तर अशावेळी काहीतरी झटपट तयार होणारं आणि पौष्टिक असणारं असं काही हवं असेल तर चटकन सॅण्डविज (sandwich recipe) डोळ्यासमोर येतं. एक- दोन प्रकारचे सॉसेस आणि थोड्याशा भाज्या, सलाड टाकलं की झालं चवदार सॅण्डविज तयार. असं भाज्या किंवा सलाड घालून केलेलं सॅण्डविज तुम्ही नेहमीच खाता. आता हा सॅण्डविजचा (Simple method of making yummy sandwich) एक नवा प्रकार करून बघा. यासाठी खूप साऱ्या भाज्या घेऊन त्या चिरत बसण्याची अजिबातच गरज नाही. त्यामुळे मुलांची शाळेची गडबड असल्यावर त्यांना नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या- संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी (evening snacks menu) हा एक उत्तम मेन्यू होऊ शकतो. (perfect menu for breakfast)

 

या सॅण्डविजचं वैशिष्ट्य म्हणजे ते झटपट तर होतंच पण करायलाही अतिशय सोपं आहे. शिवाय चीज हा लहान मुलांसकट मोठ्या मंडळींच्याही आवडीचा पदार्थ. म्हणूनच तर पिझ्झा, पास्ता यासारखे पदार्थ एक्स्ट्रा चीझ घालून खाल्ले जातात. आता त्याच पद्धतीने सॅण्डविजही करून बघा. भरपूर चीज असणारं चीज बर्स्ट सॅण्डविज. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या mukbang_india या पेजवर शेअर करण्यात आली आहे. हा सुपर यम्मी ब्रेकफास्ट पावसाळ्यात एकदा तरी करायलाच हवा..

 

कसं करायचं चीज बर्स्ट गार्लिक सॅण्डविज?
साहित्य

व्हाईट ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड, बटर, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ टीस्पून चिलीफ्लेक्स, १ टीस्पून ओरिगॅनो, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चीज स्लाईस आणि चीज क्युब.                                                                                   केक खूप उरला, खायचा कंटाळा आला? उरलेल्या केकपासून बनवा 3 टेस्टी पदार्थ, करायला सोपे आणि झटपट 
रेसिपी
- चीज बस्ट गार्लिक सॅण्डविज करण्यासाठी सगळ्यात आधी लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याची पेस्ट करून घ्या.
- एका बाऊलमध्ये २ टेबलस्पून बटर टाका. 
- त्यात लसूण पेस्ट, चिलीफ्लेक्स, ओरिगॅनो, कोथिंबीर टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.


- आता एक ब्रेड स्लाईस घ्या. त्याला आपण केलेलं हे मिश्रण लावा. त्यावर चीज स्लाईस ठेवा. वरतून थोडं चीज किसून टाका. (आपण चीज बर्स्ट प्रकारातलं सॅण्डविज करतो आहोत. त्यामुळे चीजचा वापर थोडा जास्त आहे. जर तुम्हाला एवढं चीज नको असेल तर चीज स्लाईसच वापरा. वरतून पुन्हा चीज किसून टाकू नका.)
- आता त्यावर आणखी एक ब्रेड ठेवा. या वरच्या ब्रेडलाही वरच्या बाजूनेच आपण तयार केलेलं मिश्रण लावा.
- आता तव्यावर किंवा सॅण्डविज मेकअमध्ये ब्रेड ठेवून ते टोस्ट करून घ्या.
- गरम झाल्यावर त्याचे तुमच्या आवडीनुसार उभे किंवा आडवे दोन काप करा आणि गरमागरम चीज बर्स्ट सॅण्डविज खाण्याचा आनंद घ्या. 

 

Web Title: Cheese burst sandwich recipe, How to make sandwich? Simple, easy method of making yummy sandwich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.