Lokmat Sakhi >Food > पुऱ्या फुगतच नाहीत? टम्म फुगलेल्या परफेक्ट पुऱ्यांसाठी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ट्रीक्स

पुऱ्या फुगतच नाहीत? टम्म फुगलेल्या परफेक्ट पुऱ्यांसाठी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ट्रीक्स

How To Make Perfect Puri Tips by Chef Kunal Kapoor : पाहूयात पुऱ्या करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुऱ्या छान टम्म फुगतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 05:26 PM2022-12-15T17:26:15+5:302022-12-15T17:28:32+5:30

How To Make Perfect Puri Tips by Chef Kunal Kapoor : पाहूयात पुऱ्या करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुऱ्या छान टम्म फुगतील...

Chef Kunal Kapoor shares special tricks for perfect puri | पुऱ्या फुगतच नाहीत? टम्म फुगलेल्या परफेक्ट पुऱ्यांसाठी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ट्रीक्स

पुऱ्या फुगतच नाहीत? टम्म फुगलेल्या परफेक्ट पुऱ्यांसाठी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ट्रीक्स

Highlightsपुऱ्या कधी वातड होतात तर कधी कडक..परफेक्ट पुऱ्यांसाठी सोप्या ट्रिक्सपुऱ्यांची कणीक मळण्यापासून ते तळण्यापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तरच पुऱ्या छान फुगतात

बरेचदा आपल्याला पोळ्या खाऊन कंटाळा येतो म्हणून आपण पुऱ्यांचा बेत करतो. काही वेळा पोळ्या खाऊन कंटाळा आल्याने वीकेंडलाही किंवा घरात कोणाचा वाढदिवस असेल तर आपण आवर्जून पुऱ्या करतो. पुऱ्या टम्म फुगल्या तर गरमागरम मस्त लागतात. पण काही वेळा पुऱ्या अर्धवट फुगतात आणि वातट लागतात. तर कधी कधी पुऱ्या कडक होतात. यामुळे पुऱ्या करुनही त्याची म्हणावी तशी मजा येत नाही. आता पुऱ्या करणे हे काही फार अवघड काम नाही असे आपल्याला वाटत असते. पण तरी पुऱ्या टम्म फुगल्या नाहीत की आपला मूड जातो. त्यासाठीच प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर पुऱ्या करताना नेमके काय करायला हवे याबाबतच्या काही सोप्या टिप्स आपल्यासोबत शेअर करतात. पाहूयात पुऱ्या करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या तर पुऱ्या छान टम्म फुगतील (How To Make Perfect Puri Tips by Chef Kunal Kapoor)...

१. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे पुऱ्या करताना आपण जी कणीक घेतो ती डायरेक्ट न घेता चाळून मग मळावी. 

२. पुऱ्याची कणीक थोडी घट्टसर भिजवावी लागत असल्याने पाणी जपून घालावे. एकदम पाणी घातले तर कणीक मऊ होते आणि पुऱ्या करणे अवघड होते.  

(Image : Google)
(Image : Google)

३. पुऱ्या चांगल्या फुगाव्यात यासाठी कणीक मळल्यावर त्यावर एक कापड घालून ती भिजू द्यावी. 

४. यानंतर कणकेचे एकसारखे लहान गोळे करुन घ्यावेत आणि त्यावर तेल घालून ठेवावे म्हणजे ते गोळे कडक होणार नाही. 

५. पुऱ्या लाटण्यासाठी आपले लाटणे एकदम स्वच्छ असावे तसेच लाटण्याला भेगा असता कामा नयेत. लाटणं मऊ राहण्यासाठी लाटण्यालाही सगळ्या बाजूने तेल लावून घ्यावे.

६. पुरी लाटताना ती सगळ्या बाजूने एकसारखी लाटली जायला हवी. विशेषत: काठांच्या बाजूने पुरी एकसारखी लाटली गेली तर पुरी छान फुगते. 

७. पुऱ्या तळताना तेल मोठ्या गॅसवर गरम करावे आणि मोठ्या गॅसवरच पुऱ्या तळायला हव्यात. त्यामुळे त्याला एकसारखी हीट लागून त्या चांगल्या फुगतात.

८. तळताना पुरी दाबून गोल फिरवावी म्हणजे ती फुगून वर येते. मग उलटून त्यावर सगळ्या बाजूने तेल उडवावे, यामुळे पुरी मस्त टम्म फुगते. 

Web Title: Chef Kunal Kapoor shares special tricks for perfect puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.