Lokmat Sakhi >Food > भाजी तिखटजाळ झाली तर काय कराल? शेफ पंकज सांगतात १ सोपी युक्ती, घोळ झ्टकन निस्तरेल

भाजी तिखटजाळ झाली तर काय कराल? शेफ पंकज सांगतात १ सोपी युक्ती, घोळ झ्टकन निस्तरेल

Chef Pankaj Bhadoria Easy Cooking Tips : भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही क्रिमचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:20 PM2024-07-30T13:20:27+5:302024-07-30T13:21:22+5:30

Chef Pankaj Bhadoria Easy Cooking Tips : भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही क्रिमचा वापर करू शकता.

Chef Pankaj Bhadoria Easy Tips To Reduce Spiciness Or Extra Mirch in Any Dish | भाजी तिखटजाळ झाली तर काय कराल? शेफ पंकज सांगतात १ सोपी युक्ती, घोळ झ्टकन निस्तरेल

भाजी तिखटजाळ झाली तर काय कराल? शेफ पंकज सांगतात १ सोपी युक्ती, घोळ झ्टकन निस्तरेल

महिला स्वंयपाकघरात खूप मन लावून काम करत असतात. स्वंयपाक करणं  हे महत्वपूर्ण कामांपैकी एक असते.  म्हणून स्वंयपाक करताना महिला खूपच अलर्ट असतात. जेव्हा घरात पाहूणे येतात आणि जास्त स्वंयपाक करावा लागतो तेव्हा सगळी गडबड होते. या दरम्यान जेवणात काही ना काही कमी जास्त होत राहतं. जर भाजीत तिखट, मसाला जास्त पडला तर अधिकच अडचण येऊ  शकते. (Chef Pankaj Bhadoria Easy Cooking Tips)

जेवणात  मीठ किंवा मिरची जास्त झाली तर ते फेकून देण्यापेक्षा काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. घरी पाहूणे आल्यानंतर असं काही झालं तर तुमचं  काम वाढू शकतं. शेफ पंकज भदौरिया यांनी काही  खास ट्रिक्स वापरून भाजीचा तिखटपणा कमी करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

दही घालून तिखटपणा कमी करा

शेफ पंकज सांगतात की कोणत्याही भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही डेअरी प्रोडक्ट्सचा वापर करू शकता.  भाजी, डाळ किंवा कढीपमध्ये जास्त मिरची घातली तर त्यात दही मिसळून तुम्ही बॅलेन्स करू शकता. या भाजीत तुम्ही टोमॅटोची प्युरीसुद्धा मिसळू शकता.  यासाठी प्युरी थोड्या तेलात घालून  शिजवून घ्या. 

क्रिमचा वापर करा

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही क्रिमचा वापर करू शकता. तुम्हाला ग्रेव्हीसोबत क्रिम मिक्स करावी लागेल. पनीर किंवा इतर कोणतीही भाजी असल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता. यामुळे भाजीची चव वाढेल.


सुक्या भाजीत तूप घालू शकता

शेफ पंकज सांगतात की सुक्या भाजीत तिखट जास्त झालं तर तुम्ही त्यात तूप मिसळू शकतात. तिखटपणा कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. याव्यतिरिक्त थोडं बेसन भाजून घाला. उकळलेले बटाटे मॅश करून घालू शकता. ज्यामुळे भाजील चव येईल.

Web Title: Chef Pankaj Bhadoria Easy Tips To Reduce Spiciness Or Extra Mirch in Any Dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.