श्रावण महिना आणि सण यांचे नाते अतूट आहे. श्रावण महिन्याची सुरुवात थोड्याच दिवसांत होणार आहे. श्रावण महिना म्हटला की अनेक सणवार येतात. या सणवारानिमित्त आपल्यापैकी काहीजण उपवास करतात. उपवास करताना काही मोजकेच पदार्थ खाल्ले जातात. उपवासा दरम्यान आपण फराळाचे अनेक पदार्थ खातो. उपवास केला की फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. या फराळाच्या पदार्थांमध्ये आपण शक्यतो साबुदाण्याची खिचडी, वडे, उपवासाची मिसळ, उपवासाचे कटलेट, पराठे असे अनेक पदार्थ आवडीने खातो.
उपवासाच्या अनेक पदार्थांपैकी बहुतेक सगळेच पदार्थ हे तेलात तळलेले असतात. हे तळलेले पदार्थ खायला तर सगळ्यांनाच आवडतात परंतु उपवासाच्या दिवशी काही ठराविक पदार्थच आपण खातो. त्यामुळे हे उपवासाचे पदार्थ ज्या तेलात तळले जातात हे तेल कोणत्या प्रकारचे आहे, असा प्रश्न आपल्या मनात येतो. सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार (Chef Ranveer Brar) यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर करत उपवासा दरम्यान नेमके कोणत्या प्रकारचे तेल वापरावे, याबद्दल अधिक माहिती दिली आहे(Chef Ranveer Brar clear confusion about which oil should be use during fasting).
उपवास केला असेल तर कोणते तेल वापरावे ?
शेफ रणवीर ब्रार सांगतात की, उपवासा दरम्यान तुम्ही जे पदार्थ खाता शक्यतो त्याच पदार्थांपासून तयार झालेल्या तेलाचा वापर करावा. उदाहरणार्थ :- जर तुम्ही उपवास करताना शेंगदाणे खात असाल तर शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करावा. जर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करत असाल तर घरी तयार केलेल्या शुद्ध तुपाचा वापर करावा. आपण जर बदाम खात असाल तर बदामाच्या तेलाचा वापर करावा. अशाप्रकारे उपवासा दरम्यान तुम्ही जे पदार्थ खाल त्याच पदार्थांपासून तयार झालेल्या तेलाचा वापर करावा.
हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...
पावसाळ्यात साखर - गुळाच्या डब्याला मुंग्या लागल्या ? करा सोपे ६ उपाय, मुंग्या होतील कायम दूर...
रिफाइंड ऑइल खाणे टाळावे...
शेफ रणवीर ब्रार सांगतात की, उपवासा दरम्यान शक्यतो रिफाईंड ऑइल खाऊ नये. रिफाईंड ऑइल हे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया एकत्रित करुन तयार केले जाते. रिफाईंड ऑइल तयार करताना शक्यतो शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन अशा अनेक तेलबियांचा वापर केला जातो. अशा तेलांचा स्मोकिंग पॉईंट हा खूप जास्त असतो. यामुळेच हे तेल खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. उपवासा दरम्यान रिफाईंड ऑइल किंवा त्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पचनासंबंधीं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे उपवासा दरम्यान रिफाईंड ऑइलमध्ये तयार केलेले फराळाचे पदार्थ खाल्ल्याने ब्लोटिंग किंवा पचनक्रियेशी संबंधित अनेक समस्या येऊ शकतात. अशावेळी या तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्याने उपवासा दरम्यान आपल्याला एनर्जी मिळण्याऐवजी थकवा येऊ शकतो.
उपवासा दरम्यान या तेलांचा वापर करु नका...
उपवासा दरम्यान मोहरीचे तेल आणि जवसाचे तेल अजिबात वापरु नये. याशिवाय शुद्ध तुपात तळलेले पदार्थ देखील खाणे टाळावे कारण त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो. अशा परिस्थितीत तूप गरम केल्यावर त्यातील पोषण नष्ट होते.