कारलं (Bitter Gourd) चवीला कडू असलं तरी शरीरासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कारलं एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कारलं फक्त नॅच्युरल ब्लड प्युरिफायर नसून प्रत्येक अवयव फिट ठेवण्यासही मदत करते. यातील व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, फायबर्स, आयर्न यासांरखे पोषक तत्व शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढतात. (How To Remove Bitterness In Bitter Gourd)
बरेच लोक कारलं खाण्याकडे कानाडोळा करतात. कारण त्याची चव खूपच कडू असते. कारल्याची भाजी बघताच काहीजण तोंड वाकडं करतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण कारल्याची भाजी खाण्यासाठी त्याचा कडूपणा कसा दूर करावा याबाबत प्रसिद्ध शेफ संजिव कपूर यांनी एक सोपी ट्रिक सांगितली आहे. ज्यामळे कारल्याचा कडूपणा दूर होण्यास मदत होईल.
१) मिठाचा उपाय
शेफ संजीव सांगतात की कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी मिठाचा उपाय करा. यासाठी कारलं चिरल्यानंतर त्यावर मीठ शिंपडा. १० ते १५ मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. सकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्री ही ट्रिक वापरू शकता. रात्रभर मीठात ठेवलेली कारली सकाळी भाजीसाठी वापरली तर त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मीठामुळे कारल्यात जास्तीत पाणी तयार होईल आणि कारल्याचा कडूपणा दूर होईल.
२) मध किंवा साखर
शेफ संजिव कपूर यांच्या या ट्रिक व्यतिरिक्त तुम्ही इतरही काही उपाय करू सकता. मध किंवा साखरेमुळे कारल्याचा कडूपणा दूर होण्यास मदत होते. म्हणूनच कारलं तळण्याआधी कोणत्याही भांड्यात पाणी घेऊन त्यात मध आणि साखर मिसळा नंतर या पाण्यात कारलं घाला. तेव्हा तुम्ही कारलं तळाल किंवा त्याची भाजी कराल तेव्हा मधामुळे कारल्याचा कडूपणा कमी झालेला असेल.
३) नारळपाणी
कारल्याची कडवट चव कमी करण्यासाठी नारळाचे पाणी सुद्धा वापरू शकता. यासाठी नारळाच्या पाण्यात कारलं मॅरिनेट करा त्यानंतर १५ ते २० मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. काही वेळानंतर धुवून हे कारलं वापरा. या ट्रिकनं कारल्याचा कडूपणा दूर होण्यास मदत होईल.
४) दही
दही वापरून तुम्ही कारल्याचा कडूपणा घालवू शकता. यासाठी दह्यात चिरलेले कारलं बुडवून ठेवा. एक तास असंच ठेवल्यानंतर तुम्ही कारलं धुवून भाजीत वापरू शकता. या पद्धतीने कारलं बनवल्यास लहान मुलंही आनंदाने कारलं खातील.