Lokmat Sakhi >Food > डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...

डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...

Chef Sanjeev Kapoor Shares Common Mistakes You Should Avoid While Making A Dosa : शेफ संजीव कपूर सांगतात परफेक्ट डोसा कसा करायचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 01:33 PM2023-03-01T13:33:40+5:302023-03-01T13:59:19+5:30

Chef Sanjeev Kapoor Shares Common Mistakes You Should Avoid While Making A Dosa : शेफ संजीव कपूर सांगतात परफेक्ट डोसा कसा करायचा..

Chef Sanjeev Kapoor Shares Common Mistakes You Should Avoid While Making A Dosa | डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...

डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी सकाळचा नाश्ता डोसा, इडली, उपमा, मेदू वडा असे दक्षिणात्य पदार्थ बरेचदा केला जातात. डोसा, इडली, मेदू वडा हे पदार्थ नारळाची चटणी व सांबारासोबत अतिशय आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ बनवायला देखील अतिशय सोपे असतात. उडीद डाळ व तांदूळ अशा अनेक पौष्टिक डाळी भिजवून मग त्याचे घट्टसर पीठ तयार केले जाते. या रात्रभर फुलवून घेतलेल्या पिठाचे आपण सकाळी डोसा, इडली, मेदू वडा तयार करतो. या दाक्षिणात्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने डोसा सर्वांत जास्त आणि आवडीने खाल्ला जातो.

आपण अनेक प्रकारचे व चवींचे डोसे सहज घरी झटपट तयार करु शकतो. हे डोसे कुरकुरीत आणि पातळसर झाले तरच ते खायला मजा येते. काहीवेळा आपण घरी डोसे तयार करताना ते कुरकुरीत होत नाहीत, तव्याला चिकटून राहतात, जाड होतात, अशा अनेक समस्या समोर येतात. बरेचदा तर खास डोसे बनवायचा नॉनस्टिक पॅन वापरुन देखील आपल्याला हवे तसे डोसे बनवता येत नाहीत. अशा परिस्थिती, आपण डोसे बनवताना न कळत आपल्या हातून काही छोट्या चुका होतात. या चुकांमुळेच कितीही खबरदारी घेऊन आपला डोसा उत्तम बनत नाही किंवा फसतो. डोसा बनवताना होणाऱ्या लहान लहान चुका समजून घेऊयात आणि त्यावर उपाय काय करता येतील ते पाहुयात(Chef Sanjeev Kapoor Shares Common Mistakes You Should Avoid While Making A Dosa).

डोसा तयार करताना हमखास होणाऱ्या ५ चुका :- 

चूक १ : नॉनस्टिक तव्याला कांदा व तेल यांच्या मदतीने ग्रीसिंग करणे. 

उपाय : ज्या तव्याला कोणताही अन्नपदार्थ चिकटत नाही अशा तव्याला 'नॉनस्टिक तवा' असे म्हणतात. नॉनस्टिक तव्याची हीच खासियत असते की, त्यावर बनविलेला कोणताही अन्नपदार्थ त्याला अजिबात चिकटत नाही. नॉनस्टिक तवा अशाच एका विशिष्ट्य धातूंपासून बनविलेला असतो की ज्याला पदार्थ चिकटत नाहीत. त्यामुळे आपल्या साधारण तव्यांप्रमाणे नॉनस्टिक तव्यांना कांदा व तेल यांच्या मदतीने ग्रीसिंग करण्याची अजिबात गरज नसते. त्यामुळे अशा तव्यावर डोसा केल्यास चिकटत नाही. याउलट, नॉनस्टिक तव्याला ग्रीसिंग केल्याने त्यावर अन्नपदार्थ चिकटून ते खराब होण्याची किंवा फसण्याची शक्यता असते. यासाठी नॉनस्टिक तव्याला ग्रीसिंग करणे शक्यतो टाळावे.

 

चूक २ : एकदम गरम तापलेल्या तव्यावर डोश्याचे बॅटर ओतून डोसा तयार करणे. 

उपाय : तवा खूप मोठ्या आचेवर ठेवून भरपूर प्रमाणांत तवा तापवून त्यावर डोसे केल्यास ते बिघडतात. डोश्याचे बॅटर तव्यावर सोडताना तवा खूपच तापलेला नाही, याची खात्री करावी. डोसा बॅटर तव्यावर सोडताना नेहेमी गॅस मंद आचेवरच ठेवावा. गॅस मंद आचेवर ठेवल्याने तवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणांत गरम होत नाही. डोसा बॅटर तव्यावर सोडल्यास गॅस मंद आचेवर असेल तर हळुहळु तवा गरम होईल व तोपर्यंत डोसा शिजायला मदत होईल. याकारणामुळे डोसा बॅटर तव्यावर सोडताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर असावा. गॅस मध्यम किंवा मंद आचेवर ठेवूनच मग त्यावर डोसा बॅटर सोडावे. यामुळे आपले डोसे तव्याला न चिकटता खमंग व कुरकुरीत होतील. 

चूक ३ : सिझनिंग न केलेल्या लोखंडी तव्यांवर डोसा तयार करणे. 

उपाय : नॉनस्टिक तव्याला जशी ग्रीसिंगची गरज नसते, त्याचप्रमाणे लोखंडी पॅन, भांडी यांना तितकीच सिझनिंग करण्याची गरज असते. आपण किचनमधील  लोखंडी भांडी काही ठरावीक काळानंतर सिझनिंग करतो. लोखंडी भांडी गंजून खराब होऊ नयेत यासाठी त्यांना सिझनिंग करणे गरजेचे असते. लोखंडी भांडी वेळोवेळी व्यवस्थित सिझनिंग करुन ठेवली तर त्यात तयार केलेले पदार्थ न बिघडता चांगले होतात. लोखंडी तव्यांवर किंवा भिडयावर डोसा करणार असाल तर  त्या तव्याचे आधी सिझनिंग झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. कांदा आणि तेलाच्या मदतीने लोखंडी भांडी सिझनिंग करुन घ्यावीत.  

लोखंडाची कढई, खलबत्ता गंजले आहेत? ५ टिप्स - गंज निघेल झटपट - स्वयंपाक करताना टेन्शन नाही.

सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी आपल्या sanjeevkapoor या इंस्टाग्राम पेजवरून डोसा तयार करताना हमखास होणाऱ्या छोट्या चुका कोणत्या व त्यांचे उपाय काय याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

चूक ४ : डोश्याचे बॅटर खूपच पातळ किंवा जास्त घट्टसर तयार करणे. 

उपाय : डोश्याचे बॅटर खूपच पातळ किंवा जास्त घट्टसर स्वरुपात असेल तर आपले डोसे बिघडू शकतात. डोश्याचे बॅटर तयार करताना ते पातळ किंवा घट्ट न करता ते मध्यम स्वरुपातील करावे. डोश्याचे बॅटर खूपच पातळ किंवा जास्त घट्टसर केल्यामुळे ते बॅटर तव्यावर व्यवस्थित ओतले जात नाही, त्याचबरोबर हे बॅटर तव्यावर गोलाकारात पसरवणे कठीण होते. परिणामी, डोसा व्यवस्थित तयार होत नाही, आणि तो तव्याला चिकटून बसतो. डोश्याचे बॅटर चांगले एकजीव होऊन ते पातळसर आणि एकसमान तव्यावर पसरवले गेले पाहिजे, यामुळे डोसा व्यवस्थित तयार होईल. 

चूक ५ : डोश्याचे बॅटर तव्यावर सोडण्याची पद्धत चुकते. 

उपाय : डोश्याचे बॅटर तव्यावर सोडण्याची एक खास पद्धत असते. खोलगट चमचा किंवा वाटीने तव्यावर डोश्याचे बॅटर घालून ते गोलाकार आणि एकसमान पसरवावे. पीठ पसरवताना मध्यभागाकडून सुरूवात करत बाहेरच्या दिशेला गोल फिरवून घ्यावा. मग थोडेसे तेल डोश्याच्या कडेला व्यवस्थित पसरवून घ्यावे. मंद आचेवरच डोश्याला शिजवून घ्यावे. कडांना हलका सोनेरी रंग दिसला की पातळ लाकडी चमच्याने डोश्याच्या कडांकडे हलकेच फिरवून घ्यावा.

 

 

Web Title: Chef Sanjeev Kapoor Shares Common Mistakes You Should Avoid While Making A Dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.