Join us  

भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो? शेफ संजिव कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक; झटपट चिरून होतील भाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:04 AM

How To Cut Vegetables Properly : सकाळी उठल्यानंतर नाश्ता तयार करण्यासाठी आणि जेवणाचा डबा करण्यासाठी भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो.

भाज्या चिरण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर जवळपास प्रत्येक घरांमध्ये केला जातो.  कारण या बोर्डमुळे चॉपिंग आणि कापण्याचं काम खूपच सोपं होतं.  (How To Cut Vegetables Properly) याच्या मदतीने बिना मार्बलचे तुम्ही कोणतंही काम करू शकता. चॉपिंग बोर्ड एक साधारण टुल वाटत असले तरी भाज्या चिरायलाही मजा येते. असे अनेक लोक आहेत त्यांना भाज्या चिरण्याचं काम खूपच किचकट वाटतं. (How To Cut Vegetables Like A Pro)

सकाळी उठल्यानंतर नाश्ता तयार करण्यासाठी आणि जेवणाचा डबा करण्यासाठी भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो. ऑफिसला येण्याच्या घाईत चॉपिंग बोर्डवर सतत भाज्या सटकतात.  यामुळे  इरिटेशनसुद्धा कमी होते. ही समस्या टाळण्यासाठी प्रसिद्ध शेफ संजिव कपूर यांनी या समस्येचं सोल्यूशन सांगितले आहे. त्यांनी चॉपिंग बोर्ड हलण्यापासून रोखण्यासाठी एक सोपा हॅक सांगितला आहे.  शेफ कुणार कपूर यांनी एक फोटो शेअर केला आहे. 

ऋतिक रोशनच्या ट्रेनरनं सांगितलं वेट लॉस सिक्रेट; हे १ काम करा, पटापट वजन कमी होईल

शेफ संजिव कपूर यांचा हॅक्स

सकाळी उठून नाश्ता करण्यापेक्षा जास्त वेळ भाज्या चिरण्यात जातो. ऑफिसला येण्याच्या घाईत चॉपिंग बोर्ड सटकत जातो आणि इरिटेशनसुद्धा होते. लोक या समस्येतून जातात. प्रसिद्ध शेफ संजिव कपूर यांनी हे कठीण काम सोपं करण्याची ट्रिक सांगितली आहे. त्यांनी सुरी किंवा चॉपिंग बोर्डचा वापर कोणत्या पद्धतीने करता येईल याबाबत सांगितले आहे.

 

ओल्या कापडाचा असा वापर करा

संजिव कपूर सांगतात की भाज्या चिरताना प्लेटफॉर्मवर चॉपिंग बोर्ड ठेवण्याआधी एक ओला कापड किंवा टॉवेल ठेवा. टॉवेल व्यवस्थित पसरवून ठेवा. त्यानंतर चॉपिंग बोर्ड ठेवा आणि भाज्या व्यवस्थित चिरून घ्या. या पद्धतीने काम केल्यास चॉपिंग बोर्ड अजिबात हलणार नाही. भाज्या एकदम परफेक्ट शेपमध्ये कापल्या जातील. 

हाडांना पोकळ बनवतो व्हिटामीन बी-12 चा अभाव; रोज ५ शाकाहारी पदार्थ खा; व्हिटामीन भरपूर मिळेल

चॉपिंग बोर्ड सुकवून याचा वापर करा

जर तुम्ही ओल्या चॉपिंग बोर्डचा वापर करत असाल तर ते सटकेल. यासाठी सगळ्यात आधी चॉपिंग बोर्ड सुकवून घ्या. सेफ्टी आणि क्लिनिंग दोन्हींची काळजी घ्या.  बोर्ड स्वच्छ आणि सुकलेला असणं फार महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त खाण्याचे कण बोर्डच्या भागात चिकटत असतील तर बोर्ड सतत सटकेल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स