'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनची (Allu Arjun) पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. स्नेहा रेड्डी ही एक यशस्वी बिझनेस वुमन तर आहेच सोबतच ती एक उत्तम शेफ देखील आहे. स्नेहा नेहमीच (Chia Seed Recipe) आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फॅमेली, फूड, लाईफस्टाईल, फिटनेसशी संबंधित माहिती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. स्नेहाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिला आवडणाऱ्या आणि हेल्दी अशा चिया सीड्स पुडिंगची झटपट रेसिपी शेअर केली आहे(Pushpa Superstar Allu Arjun Wife Sneha Reddy Favorite Dish Chia Seeds Pudding Recipe Shared On Instagram).
स्नेहाला चिया सीड्स पुडिंग खायला भरपूर आवडते, आणि ती तिची सगळ्यात आवडीची डिश आहे. स्नेहाने चिया सीड्स पुडिंग तयार करतानाचे तिचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. स्नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या डिशची रेसिपी शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "एन्जॉय करण्यासाठी एक छोटासा बाऊल तयार करत आहे." पुष्पा फेम अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा हीची आवडती डिश असलेल्या तसेच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असलेल्या चिया सीड्स पुडिंगची खास रेसिपी पाहूयात(Allu Arjun's wife Sneha Reddy whips up her ‘favourite bowl of goodness’; see her nutrient-packed chia seed recipe).
साहित्य :-
१. बर्फाचे तुकडे - ५ ते ६ तुकडे
२. केळ्याचे काप - १ कप
३. ग्रीक योगर्ट - १ कप
४. डाळिंबाचे दाणे - १/२ कप
५. चिया सीड्स - १/२ कप (भिजवून घेतलेले)
६. ब्लूबेरीज किंवा कोणतेही आवडते फळ - १ कप
७. आळशी - २ टेबलस्पून (कोरडी भाजून घेतलेली)
८. बदामाचे तुकडे किंवा काप - २ टेबलस्पून
मूठभर शेवग्याच्या पानांची चटणी करा, चमचाभर चटणी देते हाडांना ताकद भरपूर - पाहा रेसिपी...
घरी पनीर करताना लक्षात ठेवा ८ टिप्स, पनीर होईल विकतसारखं मऊमुलायम परफेक्ट...
कृती :-
१. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात बर्फाचे तुकडे, केळ्याचे काप, ग्रीक योगर्ट, डाळिंबाचे दाणे आणि भिजवून घेतलेले चिया सीड्स घ्यावेत. आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात एकत्रित मिसळून व्यवस्थित एकजीव आणि क्रिमी टेक्श्चर येईपर्यंत ब्लेंड करुन घ्यावेत.
२. मिक्सरमधील ब्लेंड करून तयार झालेले क्रिमी मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यात भिजवलेले चिया सीड्स, ब्लूबेरीज किंवा तुमच्या आवडीनुसार जे फळ आवडत असेल त्याचे काप करुन घालावेत. मग त्यावर डाळिंबाचे दाणे, हलकेच भाजलेल्या आळशीच्या बिया आणि बदामाचे तुकडे किंवा काप घालावेत.
३. याचबरोबर, या पुडिंगमध्ये आपण आपल्या आवडीनुसार आवडती फळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुटस देखील घालू शकतो. फायबर, व्हिटॅमिन आणि प्रोटीनयुक्त चिया सीड्स पुडिंग खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन कमी करण्यासाठी ही एक उपयुक्त अशी हेल्दी रेसिपी आहे.
चिया सीड्स पुडिंग खाण्यासाठी तयार आहे. आपण हे सकाळच्या नाश्त्यात खाऊ खाऊ शकता.