बालदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. अगदी शाळेपासून ते घरापर्यंत सगळीकडेच बच्चे कंपनीची मजा सुरू आहे. बालदिनानिमित्त कित्येक आई- बाबा त्यांना जमेल तसं मुलांसाठी काही ना काही सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग सेलिब्रिटी तरी त्याला अपवाद कसे असणार.. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेसुद्धा बालदिनानिमित्त तिच्या मुलांना एक खास ट्रिट दिली आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले (Childrens day celebration by Anushka sharma and Virat Kohli). त्यामध्ये असं दिसत आहे की अनुष्काने वामिका आणि अकाय या तिच्या दोन्ही मुलांना नूडल्स खाऊ घातल्या. पण त्या नूडल्स काही साध्यासुध्या नव्हत्या. तर तिने तिच्या मुलांसाठी अतिशय पौष्टिक असणाऱ्या मिलेट नूडल्स केल्या होत्या (millet noodles recipe). या नूडल्स नेमक्या कशा असतात आणि त्या कशा करायच्या ते पाहा..(how to make millet noodles?)
मिलेट नूडल्स म्हणजे काय?
आपण एरवी ज्या नूडल्स खातो त्या नूडल्स मैदा आणि गहू यापासून तयार केल्या जातात. या दोन्ही पदार्थांमध्ये ग्लूटेन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या नूडल्स पचायला अतिशय जड असतात.
धुतल्यानंतर स्वेटर, लोकरीचे कपडे सैलसर होतात, फिटींग बिघडते? ४ चुका टाळा, कपडे राहतील नव्यासारखे
त्यामुळे शक्यतो अशा नूडल्स खाणं टाळावं, असा सल्ला आहारतज्ज्ञ नेहमीच देतात. पण त्या एवढ्या चवदार असतात की नूडल्स खाण्याचा मोह लहान मुलांनाच काय पण मोठ्या माणसांनाही आवरता येत नाही.
म्हणूनच जर तुम्हाला नूडल्स खायच्याच असतील तर मैदा किंवा गहू यापासून तयार झालेल्या नूडल्स खाण्यापेक्षा मिलेट नूडल्स खा, असं तज्ज्ञ सांगतात. या नूडल्समध्ये मैदा किंवा गहू नसतो.
मुलं सारखी चिडतात, ओरडून बोलतात? 'ही' युक्ती करून पाहा, राग शांत होऊन प्रेमाने बोलू लागतील
त्याऐवजी बाजरी, ज्वारी, नाचणी असे वेगवेगळे धान्य वापरून त्या तयार केल्या जातात. य नूडल्समध्ये एमएसजी, कोलेस्टॉल, प्रिझर्व्हेटीव्ह तसेच कोणतेही ट्रान्सफॅट नसतात. त्यामुळे त्या लहान मुलांना द्यायलाही हरकत नाही.
कॅल्शियम, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात देणाऱ्या मिलेट नूडल्स हल्ली बऱ्याच ठिकाणी मिळतात. तुमच्या भागात त्या मिळत नसतील तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही त्या मागवू शकता.
त्रिपुरारी पौर्णिमा: किसणी वापरुन करा ५ मिनिटांत ५० वाती- झटपट त्रिपुरवात करण्याची सोपी ट्रिक
एरवी आपण जशा नूडल्स करतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या, सॉस आणि मसाले वापरून मिलेट नूडल्स तयार करता येतात. हल्ली मैदा आणि गव्हाच्या नूडल्ससाठी एक उत्तम पर्याय म्हणून मिलेट नूडल्सकडे पाहिले जात आहे.