Join us  

चमचमीत चिली पोटॅटो! पनीर चिली खाताच, बटाट्याचा टेस्टी सोपा प्रकार खाऊन म्हणाल.. वाह..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 4:27 PM

Simple Recipe Of Chili Potato: पनीर चिली हा सुपर टेस्टी प्रकार आपण नेहमीच खातो. आता जवळपास तशाच टेस्टचा हा चिली पोटॅटो (Chili Potato) प्रकार करून बघा. खायला अतिशय यम्मी... 

ठळक मुद्देचव पनीर चिलीसारखीच. पण पनीर न घालता बटाटे घालून केलेला चिली पोटॅटो

पनीर चिली (paneer chili) हा प्रकार काही जणांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ. मग तो रिमझिम पावसात खायलाही आवडतो आणि कडाक्याच्या थंडीत गरमागरम, तिखट- तिखट पनीर चिलीचा आस्वाद घ्यायलाही भारीच मजा येते. अनेक जणी आता घरी सराईतपणे पनीर चिलीही बनवतात. आता तशाच पद्धतीने हा चिली पोटॅटो (Simple Recipe Of Chili Potato) प्रकार बनवून बघा. चव पनीर चिलीसारखीच. पण पनीर न घालता बटाटे घालून केलेला चिली पोटॅटो (How to make chili potato?). घरी लहान मुलांसकट मोठ्यांनाही नक्कीच आवडेल. ही सुपर यम्मी रेसिपी इन्स्टाग्रामच्या thelostchefff या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे.

 

चिली पोटॅटो रेसिपीसाहित्यदोन बटाटे, तळण्यासाठी तेल, कॉर्नफ्लॉवर, मिरेपूड, आलं- लसूण पेस्ट, हिरवी सिमला मिरची चौकोनी आकारात कापलेली, कांद्याच्या चौकोनी फोडी, हिरव्या मिरचीचे तुकडे, टोमॅटो साॅस, सोया सॉस, रेड चिली पावडर, कांद्याची पात आणि चवीनुसार मीठ.कसे करायचे चिली पोटॅटो?- यासाठी सगळ्यात आधी सालं काढून बटाट्याचे मध्यम आकाराचे उभे काप करून घ्या. फिंगर चिप्स करण्यासाठी जसे काप असतात, त्यापेक्षा मोठे काप असावेत.- आता एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात बटाट्याचे काप टाका आणि ३ ते ४ मिनिटे उकळू द्या.

- त्यानंतर बटाटे पाण्यातून काढून एका भांड्यात घ्या. त्यावर अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर एक टीस्पून मिरेपूड टाका. सगळ्या फाेडींना ते व्यवस्थित लागलं पाहिजे.- यानंतर कढईत तेल टाका. तेल तापलं की त्यात या बटाट्याच्या फोडी टाकून डिप फ्राय करून घ्या.- आता दुसऱ्या कढईत तेल टाका. तेल तापल्यानंतर त्यात आलं- लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. - त्यानंतर कांदा आणि सिमला मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून परतून घ्या.

- व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात अर्धा टेबलस्पून सोया सॉस आणि एकेक टेबलस्पून टोमॅटो सॉस, रेड चिलीसॉस टाकून परतून घ्या. - एका वाटीत दोन चमचे पाणी आणि अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाका आणि त्याचं मिश्रण बनवून ते देखील या ग्रेव्हीत टाका. चिमूटभर मीठ टाका. - आता सगळ्या शेवटी त्यात फ्राय केलेले बटाट्याचे काप टाका आणि सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या.- साधारण अर्ध्या मिनिटाने गॅस बंद करा. गरमागरम आणि अतिशय चमचमीत चिली पोटॅटो झाले तयार. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.