Join us  

जेवणाबरोबर खायला करा गावरान हिरव्या मिरचीचा ठेचा; सोपी रेसेपी, मोठेच नाही तर मुलंही आवडीने खातील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 9:24 AM

Chill green chilli Thecha Recipe (Hirvya Mirchicha Thecha Recipe) : ठेचा करण्याासाठी मिरची बारीक करणं ही महत्वाची स्टेप आहे यासासाठी तुम्ही पाटा वरवंटा वापरला तर चव अनेक पटीने वाढेल.  

नेहमीचे गोड-धोड पदार्थ आणि साधा वरण भात खाऊन कंटाळा आला की काहीतरी तिखट खाण्याची इच्छा होते अशावेळी तुम्ही जेवताना भाकरी किंवा चपाती बरोबर खाण्यासााठी मिरचीचा ठेचा ट्राय करू शकता. (Cooking Hacks) मिरचीचा ठेचा करणं एकदम सोपं आहे. (Hirvya Mirchicha Thecha Recipe) हा ठेचा करण्याासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही फक्त खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  (How to make Green Chilli Thecha at home) मिरचीचा ठेचा करण्यासाठी तुम्ही लाल  मिरची किंवा हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. फक्त गडद हिरव्या मिरचीचा वापर करू नका कारण ही मिरची चवीला खूपच तिखट असते. (Green chilli Thecha Recipe)

मिरचीचा ठेचा करण्यासाठी लागणारं साहित्य (Mirchi Thecha Making Steps) 

१) पोपटी मिरच्या- १२ ते १५

२) शेंगदाणे- ५० ग्राम

३) लसूण- १ वाटी

४) कोथिंबीर- १ वाटी

५) मीठ- १ टिस्पून

६) तेल-  २ ते ४ टिस्पून

मिरचीचा ठेचा करण्याची सोपी कृती (How to make Mirchi Thecha, Green Chilli Thecha)

1)  झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तव्यात शेंगदाणे तव्यावर भाजून घ्या. शेंगदाणे अर्धवट परतवून झाले की त्यात हिरवी मिरची घाला. 

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत-काटेरी चकली; २० मिनिटांत खमंग चकली करण्याची सोपी रेसिपी

2) तुम्ही आवडीप्रमाणे मोठी जाड मिरची किंवा लांबट पोपटी मिरची घेऊ शकता. ठेचा करण्याासाठी मिरची बारीक करणं ही महत्वाची स्टेप आहे यासासाठी तुम्ही पाटा वरवंटा वापरला तर चव अनेक पटीने वाढेल.  पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही खलबत्त्याचा वापरही करू शकता. मिक्सरचा वापर करणं टाळा कारण त्यामुळे ठेच्याला हवंतसं टेक्सचर येणार नाही. 

१ कप रव्याचा करा खमंग मेदू वडा; सोपी कृती, आतून मऊ वरून क्रिस्पी मेदूवडा १० मिनिटांत बनेल

3) सगळ्यात आधी भाजून घेतलेल्या  मिरच्या बारीक करून घ्या. मिरच्या बारीक केल्यानंतर  त्यात लसूण आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करून घ्या. त्यात मीठ आणि शेंगदाणे घालून पुन्हा एकत्र बारीक करून घ्या.

4)  तयार आहे झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा. हा ठेचा तुम्ही तोंडी लावणीसाठी ताटात वाढू शकतात. थंडीच्या दिवसांत भाकरी किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. 

5) जर तुम्हाला जास्त तिखट ठेचा नको असेल तर तुम्ही तिखटपणा कमी करण्यासाठी बेसन पीठ भाजून यात घालू शकता. यामुळे ठेच्याला चांगली चव येईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स